LIVE NOW

LIVE Article 370 : राज्यसभेत अमित शहांनी मांडलेलं जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक संमत

हे कलम हटवल्यानं भ्रष्टाचाराला आळा बसेल असा दावा सरकारने केला आहे.

Lokmat.news18.com | August 5, 2019, 8:49 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 5, 2019
auto-refresh

Highlights

Load More
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून लागू असलेलं कलम 370 अंशत: रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या नव्या निर्णयाने जम्मू काश्मीरपासून लडाख वेगळं होईल. तसंच जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश होणार आहे. केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये विकासाचे प्रकल्प राबवणार आहे.  हे कलम हटवल्यानं भ्रष्टाचाराला आळा बसेल असा दावा सरकारने केला आहे. राज्यसभेत अमित शहांनी मांडलेलं जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक संमत झालं आहे.