आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला दणका देण्याच्या तयारीत भारत, 'हा' आहे नवा प्लॅन

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला दणका देण्याच्या तयारीत भारत, 'हा' आहे नवा प्लॅन

काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्र संघात तक्रार करू, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यानंतर पाकिस्तान हडबडला आहे. त्यामुळेच पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानच्या या हालचालींना भारतही आता चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.

काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्र संघात तक्रार करू, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दिला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही रणनीती आखली आहे. 'याप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्र संघाच्या पाच स्थायी आणि 10 अस्थायी सदस्यांसोबत सध्या चर्चा करत आहे. भारताने जम्मू काश्मिरातील कलम 370 का हटवलं, याबाबात त्यांना माहिती दिली जात आहे. या निर्णयाचे जम्मू काश्मिरातील लोकांना नेमके काय आर्थिक फायदे होतील, हे या चर्चेद्वारे समजावून सांगितलं जात आहे. तसंच जम्मू काश्मिरात पाकिस्तान वारंवार करत असलेल्या कुरापतींकडे संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांचं लक्ष वेधण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत,' अशा आशयाचं वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्स या दैनिकाने दिलं आहे.

दरम्यान, कलम 370 च्या मुद्द्यावर आधीच पाकला धक्का बसला आहे. भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने सगळ्यात आधी मलेशिया आणि तुर्की या देशांकडे मदत मागितली. त्यासोबतत ऑर्गेनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनमध्ये पाकिस्ताने हा मुद्दा उपस्थित केला. पण सगळीकडूनच पाकिस्तानची निराशा झाली आहे.

कलम 370 रद्द केल्याच्या मुद्द्यावरून UAE ने थेट भारताच्या बाजू घेतली आहे तर मलेशियाने या मुद्द्यावर आमची नजर असेल, असं आश्वासन दिलं आहे. तसंच तुर्कीनेही केवळ लवकरच मदत करू, अशा आश्वासनावर पाकिस्तानची बोळवण केली. त्यामुळे पाकिस्तान आणखीनच बॅकफूटवर गेला आहे.

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 10:18 AM IST

ताज्या बातम्या