'अमित शहांनी धोका दिला' म्हणत माजी मुख्यमंत्री रडू लागले...

'अमित शहांनी धोका दिला' म्हणत माजी मुख्यमंत्री रडू लागले...

‘गृहमंत्री अमित शहा यांनी धोका दिला. आमची भारताकडून ही अपेक्षा नव्हती’

  • Share this:

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मिरातील नेत्यांनी मोठा गदारोळ सुरू केला आहे. अशातच आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘हा निर्णय म्हणजे एकप्रकारचा दरोडाच आहे,’ असं अब्दुल्ला यांनी ‘CNN NEWS18’ सोबत बोलताना म्हटलं आहे.

‘गृहमंत्री अमित शहा यांनी धोका दिला. आमची भारताकडून ही अपेक्षा नव्हती,’ असं म्हणत फारुख अब्दुल्ला हे रडलेदेखील आहेत. तसंच त्यांनी आपल्याला सरकारने नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र अब्दुला यांचा हा दावा फेटाळला आहे.

काय आहे केंद्र सरकारचा निर्णय?

जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतलं 370वं कलम हटवलं आहे. राज्याच्या इतिहासातला हा सर्वात मोठा निर्णय समजला जातोय. लडाख या पहाडी क्षेत्रालाही जम्मू आणि काश्मीरपासून वेगळं करत केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे.

370 कलम काढून घेतल्यानंतर काय फरक पडणार?

- आता सरळ केंद्र सरकार जम्मू काश्मीरचे कामकाज पाहणार

- केंद्र सरकार स्वतः विकासाचे प्रकल्प राबविणार

- राज्याचा दर्जा काढल्यामुळे दिल्ली राज्यसारखी सारखी परिस्थिती निर्माण होणार

- जमीन खरेदी, व्यवसाय करण्याचा अधिकार मिळणार

- भ्रष्टचाराला आळा बसेल असा सरकारचा दावा

- वेगळा झेंडा लावण्याचा अधिकार काढून घेण्यात आला

- उपराज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकार काम करणार

VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 04:13 PM IST

ताज्या बातम्या