PDP खासदाराने राज्यसभेतच संविधान फाडलं, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध

PDP खासदाराने राज्यसभेतच संविधान फाडलं, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध

पीडीपीच्या एका खासदाराने तर थेट संविधानच फाडलं. खासदाराच्या या कृत्यावर आता चहुबाजूने टीका होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून लागू असलेलं कलम 370 अंशत: रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत राज्यसभेत शिफारस केल्यानंतर पीडीपी खासदारांसह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पीडीपीच्या एका खासदाराने तर थेट संविधानच फाडलं. पीडीपी खासदाराच्या या कृत्यावर आता चहुबाजूने टीका होत आहे.

अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस करताच विरोधकांचा गोंधळ घातला. पण केंद्र सरकारने कलम 370 अंशत: हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश राहणार असून लडाख हे वेगळं राज्य तयार करण्यात येईल.

दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम '35 अ' रद्द करण्याच्या चर्चा सुरू होताच काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. राज्यात याआधीच कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसंच सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने काश्मीर प्रश्नावर उत्तर म्हणून नवी रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. धुमसतं काश्मीर शांत करण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं.

जम्मू काश्मीरमधील तणावात वाढ होऊ नये म्हणून तिथं इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही बंद करण्यात आली होती. काश्मीरमधील सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली. तसंच पोलीस अधिकाऱ्यांना सॅटेलाईट फोन देण्यात आले होते.

VIDEO: विरोधक देशासोबत असते तर भीक मागायची वेळ आली नसती, राऊतांची काश्मीर प्रश्नावर प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 12:27 PM IST

ताज्या बातम्या