Article 370 : जल्लोष करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी केली अटक

Article 370 : जल्लोष करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी केली अटक

हे शिवसैनिक फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करत होते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  • Share this:

चंदिगड 6 ऑगस्ट : धाडसी निर्णय घेत केंद्र सरकारने वादग्रस्त 370वं कलम हटविण्याची घोषणा सोमवारी केली. राज्यसभेनं हे विधेयक मंजूरही केलं. आज लोकसभेत यावर चर्चा सुरू आहे. भाजप आपल्या जन्मापासून हे कलम काढून टाकण्याची मागणी करत होता. त्यांचं हे स्वप्न पूर्ण झाल्याने देशभर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषात शिवसेनाही सामिल झाली. मात्र पंजाबच्या पातियाळामध्ये जल्लोष करणाऱ्या 8 शिवसैनिकांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे शिवसैनिक फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करत होते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना कोर्टातही सादर केलं जाणार आहे.

पंजाब हे पाकिस्तान सीमेवरचं राज्य असल्याने तिथे खास काळजी घेण्यात येत आहे.

VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

समाजकंटकांकडून घातपात घडविला जाण्याची शक्यता असल्यानं सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रश्नावर विरोधही नाही आणि समर्थनही नाही अशी त्यांची भूमिका आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत सामाजिक शांतता बिघडवू देता कामा नये अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

PUBG खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

कोर्टात मिळू शकतं आव्हान

केंद्र सरकारने काल (सोमवारी ) जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं संविधानातील कलम 370 आणि कलम 35अ रद्द केलं आहे. लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळ करण्यात आलं आहे. तसंच आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असणार आहे. पण सरकारच्या या निर्णयाची अंबलबजावणी करताना काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

काश्मीर खोऱ्यातील काही नेते कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. ‘कलम 370 रद्द करण्याबाबत संविधानात काही विशिष्ट अटी ठेवण्यात आल्या आहेत,’ असं या नेत्यांचं म्हणणं आहे.

'प्रहार'च्या जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकरांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

शाह फैजल यांच्या पक्षाच्या शेहला रशीद यांनी ट्वीट करत सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची घोषणा केली आहे. ‘जम्मू काश्मीरच्या सरकारला राज्यपाल आणि संविधान सभेला विधानसभेत बदलून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा राज्यघटनेसोबत विश्वासघात आहे,’ असं शेहला रशीद यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध असणारे नेते आता कोर्टात धाव घेणार आहेत. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 02:55 PM IST

ताज्या बातम्या