कॅमेरामागचा जादूगार - महेश लिमये

कॅमेरामागचा जादूगार - महेश लिमये

युथ ट्युबच्या या भागात आपण भेटलो एका अशा माणसाला, ज्याला तुम्ही पाहिलं नसेलच. पण त्याचं काम तुम्ही नक्कीच पाहिलं असणार. नाही म्हणूच नका, कारण फॅशन, कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, उत्तरायण, एवढसं आभाळ यातला एक तरी सिनेमा बघितलाच असणार ! आणि हे सगळे सिनेमे तुमही पाहिले असतील, तरी तुम्हाला 'तो' माहित नाही. आता तुमची उत्सुकता आणखी ताणून तुम्ही समोरचा कॉम्प्युटर (किंवा मी समोर असलो तर माझं डोकं) फोडायच्या आत मी सांगूनच टाकतो. युथ ट्युबच्या या भागात आपण ओळख करून घेतली प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर महेश लिमयेची. सिनेमेटोग्राफीचं कोणतही फॉर्मल एज्यूकेशन घेतलं नसतानाही तो आज एक यशस्वी सिनेमेटॉग्राफर म्हणून ओळखला जातो.सिनेमेटॉग्राफीविषयी बोलताना तो म्हणाला, 'सिनेमोटॉग्राफी म्हणजे मोशन पिक्चर कॅमेरा. म्हणजे तुम्ही तुमची स्किल्स आणि फ्रेमिंग टेक्निक वापरून दिलेला सीन जास्तीत जास्त चांगला बनवणं. एकच सीन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकता. त्यातलं योग्य टेक्निक निवडून तो शॉट जास्तीत जास्त चांगलं बनवणं म्हणजे सिनेमेटॉग्राफी'महेशच्या कुटुंबातलं कोणीही या क्षेत्रात नव्हतं. पण पहिल्यापासूनच त्याला या क्षेत्राचं आकर्षण होतं. जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला असताना व्ही टीव्ही, एम टीव्ही वरचे व्हिडिओज बघून तो जाम इम्प्रेस झाला होता. हेच आपल्याला करायचंय, हे त्यानं तेव्हाच ठरवून टाकलं. कॉलेजपासूनच महेशनं तशी तयारी सुरू केली होती. त्याविषयी बोलताना महेश सांगतो 'आम्हाला कॉलेजमध्ये ब्लॅक अँड व्हाईट रोल मिळायचे. तेव्हा मी दिवसभर लॅबमध्ये पडिक असायचो आणि दिवसभर एखाद्या गुड लुकिंग मुलाच्या किंवा मुलीच्या शोधात असायचो. आणि असं कोणी सापडलं की दिवसभर त्याला/तिला मॉडेल बनवून फोटो काढत रहायचो.'या क्षेत्रात स्थिरावायला खूप स्ट्रगल करावा लागतो आणि महेशलाही तो चुकला नाही. त्याविषयी बोलताना तो म्हणाला 'माझे या क्षेत्रात कोणतेही कॉन्टॅक्ट्स नव्हते. मग मी एका ठिकाणी प्रॉडक्शन ट्रेनी म्हणून जॉइन झालो. त्या ठिकाणी मी पडेल ती कामं केली. पण शिकण्याची इच्छा असल्यामुळे कष्टांचं काही वाटत नव्हतं. नंतर तिथल्याच एका कॅमेरामनच्या सल्ल्यावरून मी असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम सुरू केलं. आणि 1999 ते 2003 या काळात मी 20 ते 30 वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या कॅमेरामनबरोबर काम केलं. ' या काळात महेशनं टीव्हीएस, पॉन्ड्स, लॅक्मे, लीवाईस अशा अनेक जाहिरातींवर काम केलं.'स्वत:चे डोळे उघडे ठेवले, सतत वेगवेगळ्या अँगल्सचा, लाईट इफेक्ट्सचा विचार केला की काम आपसूक चांगलं होत जात जातं.' असं सांगत तो म्हणाला 'प्रत्येक सीनवर मी प्रचंड कष्ट घेतो, एक दोन लोकांनी जरी माझ्या कामाचं कौतुक केलं तरी प्रचंड समाधान मिळतं.' 'पहिल्यापासूनच कामावर लक्ष असल्यानं बॉलिवुडच्या गलॅमरस जगाचा मला काही फरक पडला नाही' असं त्यानं सांगितलं. एक अ‍ॅक्शन फिल्म करण्याची इच्छा असल्याचंही महेशनी सांगितलं. महेशचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या कामाची छोटीशी झलक पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लीक करा.

  • Share this:

First published: November 22, 2008, 3:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या