आदिवासींचा विराट मोर्चा निघला विधानसभेकडे

आदिवासींचा विराट मोर्चा निघला विधानसभेकडे

01 मार्चजिंदाबादचा नारा देत खान्देशातील आदिवासींनी मुंबईवर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुड्यातील जवळपास 7 हजार आदिवासींचा सहभाग असलेला हा विराट मोर्चा आज जळगावहून विधानसभेवर निघाला आहे. केंद्राच्या वनजमीन हक्क कायद्याचा फायदा राज्य सरकार आदिवासींना देत नसल्याचं या आदिवासींचं म्हणणं आहे. लोकसंघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. ही पदयात्रा 15 मार्चला मुंबईत पोहोचणार आहे. हा मोर्चा जल, जंगल आणि जमीनीवरील हक्कासाठी आदिवासींचा लढा असल्याचं या आदिवासींचं म्हणणं आहे. राजस्थानचे सामाजिक कार्यकर्ते जोहडवाले बाबा 'राजेन्द्रसींग', भारत पाटणकर, सुभाष लमोटे, गुजरातच्या माधुरीबेन यासह तृतीय पंथीयांच्या नेत्या लक्ष्मी यांचाही सहभाग या पदयात्रेत आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे मोर्चाचं नेतृत्व करत आहे. आपल्या परंपरागत तालवाद्यांसहित अत्यंत शिस्तबद्द पध्दतीनं निघालेला हा मोर्चा अनेकांचं लक्ष वेधून घेत होता.आदिवासींच्या मागण्या - उपविभागीय समित्यांनी अपात्र ठरवलेल्या दाव्यांची फेरतपासणी - अभयारण्य क्षेत्रातल्या दावेदारांचे हक्क मिळावे- अंशत: पात्र केलेल्यांना त्यांच्या ताब्यातील जमिनीचा पूर्ण हक्क द्यावा- परंपरागत रहिवाशांचे अधिकार द्यावे- सर्व वनपाड्यांना आणि वनांमधल्या वस्त्यांना महसुली दर्जा द्यावा - सर्व पात्र दावेदारांना आदिवासी विभागाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा- सर्व पात्र दावेदारांना पक्का 7/12 देण्यात यावा

  • Share this:

01 मार्च

जिंदाबादचा नारा देत खान्देशातील आदिवासींनी मुंबईवर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुड्यातील जवळपास 7 हजार आदिवासींचा सहभाग असलेला हा विराट मोर्चा आज जळगावहून विधानसभेवर निघाला आहे. केंद्राच्या वनजमीन हक्क कायद्याचा फायदा राज्य सरकार आदिवासींना देत नसल्याचं या आदिवासींचं म्हणणं आहे.

लोकसंघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. ही पदयात्रा 15 मार्चला मुंबईत पोहोचणार आहे. हा मोर्चा जल, जंगल आणि जमीनीवरील हक्कासाठी आदिवासींचा लढा असल्याचं या आदिवासींचं म्हणणं आहे. राजस्थानचे सामाजिक कार्यकर्ते जोहडवाले बाबा 'राजेन्द्रसींग', भारत पाटणकर, सुभाष लमोटे, गुजरातच्या माधुरीबेन यासह तृतीय पंथीयांच्या नेत्या लक्ष्मी यांचाही सहभाग या पदयात्रेत आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे मोर्चाचं नेतृत्व करत आहे. आपल्या परंपरागत तालवाद्यांसहित अत्यंत शिस्तबद्द पध्दतीनं निघालेला हा मोर्चा अनेकांचं लक्ष वेधून घेत होता.

आदिवासींच्या मागण्या

- उपविभागीय समित्यांनी अपात्र ठरवलेल्या दाव्यांची फेरतपासणी - अभयारण्य क्षेत्रातल्या दावेदारांचे हक्क मिळावे- अंशत: पात्र केलेल्यांना त्यांच्या ताब्यातील जमिनीचा पूर्ण हक्क द्यावा- परंपरागत रहिवाशांचे अधिकार द्यावे- सर्व वनपाड्यांना आणि वनांमधल्या वस्त्यांना महसुली दर्जा द्यावा - सर्व पात्र दावेदारांना आदिवासी विभागाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा- सर्व पात्र दावेदारांना पक्का 7/12 देण्यात यावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 03:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading