मुख्यमंत्र्यांसाठी जागा सोडणार्‍यांना राज्यसभेची जागा नाही- माणिकराव ठाकरे

21 फेब्रुवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेची निवडणूक लढवतील असं स्पष्ट झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली ती जागेची. त्यांच्यासाठी कोण विधान परिषदेची जागा सोडेल यासाठी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार व्युहरचना सुरू आहे. सध्या यांना निवडून येण्यासाठी 9 पैकी एका परिषद सदस्याला आपली जागा सोडावी लागेल, मात्र मुख्यमंत्र्यांची राज्यसभेची जागा त्याला मिळणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांसाठी कोण सोडणार आमदारकी?विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना कुठल्याही परिस्थितीत 10 मेपर्यंत आमदार बनणं आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे. पण या पूर्ण वर्षात काँग्रेसकडे विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूकच नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी एका विधानपरिषद सदस्याचा राजीनामा घेण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. तसेच आपली जागा सोडणार्‍या आमदाराला मुख्यमंत्र्यांची राज्यसभेची जागा मिळणार नाही, हेही काँग्रेसनं स्पष्ट केलं. जसं प्रदेशाध्यक्ष म्हणतात, त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसनं 9 विधानपरिषद सदस्यांची नाव हायकमांडकडे पाठवली आहेत. यामध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये माणिकराव ठाकरे, उल्हास पवार, राजन तेली आणि एस. क्यु. झमा हे चार सदस्य निवृत्त होता. पण यांच्यापैकी कोणा एकाची जागा घेतली, तर पृथ्वीराज चव्हाण हे केवळ वर्ष-दीड वर्षासाठी मुख्यमंत्री आहेत असा संदेश सर्वत्र जाऊ शकतो. त्यामुळे या चौघांच्या जागा टिकून राहतील असं दिसत आहे. 2014 मध्ये विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड निवृत्त होत आहे. पण या दोघांच्याही राजीनाम्याची शक्यता अनेक अर्थांनी कमी आहे. 2016 पर्यंत मुदत असणा-या दिप्ती चौधरी, हुसेन दलवाई आणि संजय दत्त यांच्याकडे पाच वर्षांचा काळ आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणा एकाला आपली जागा मुख्यमंत्र्यांसाठी सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यात दिप्ती चौधरी महिला आहेत, तर हुसेन दलवाई अल्पसंख्यांक समाजाचे आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन केलेल्या संजय दत्त यांचा पत्ता कट होऊ शकेल अशी चर्चा आहे. आपल्या एका आमदाराला मुख्यमंत्र्यांसाठी जागा सोडण्यास तयार करतानाच प्रदेश काँग्रेसनं दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना आणखी एक वेगळा पर्याय सुचवलेला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार गुरूनाथ कुलकर्णी यांच्या जागेचा. ही जागा राज्यपाल नियुक्त आहे त्यामुळे कुठलीही निवडणूक न होता मुख्यमंत्र्यांना मानाने विधानपरिषदेवर जाता येईल असं प्रदेश काँग्रेसला वाटतं. पण मुख्यमंत्री प्रदेश काँग्रेसचा हा पर्याय स्वीकारतीलच असं नाही. कारण राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेवर जाणं तितक सं शोभनीय नाही आणि संकेतानाही धरुन नाही. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीवरून काँग्रेस आणि आघाडीमध्ये खरंच मोठा पेच झाला. हा पेच आता कसा सुटतो आणि मुख्यमंत्री कधी आमदार बनतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2011 10:35 AM IST

मुख्यमंत्र्यांसाठी जागा सोडणार्‍यांना राज्यसभेची जागा नाही- माणिकराव ठाकरे

21 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेची निवडणूक लढवतील असं स्पष्ट झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली ती जागेची. त्यांच्यासाठी कोण विधान परिषदेची जागा सोडेल यासाठी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार व्युहरचना सुरू आहे. सध्या यांना निवडून येण्यासाठी 9 पैकी एका परिषद सदस्याला आपली जागा सोडावी लागेल, मात्र मुख्यमंत्र्यांची राज्यसभेची जागा त्याला मिळणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांसाठी कोण सोडणार आमदारकी?

विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना कुठल्याही परिस्थितीत 10 मेपर्यंत आमदार बनणं आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे. पण या पूर्ण वर्षात काँग्रेसकडे विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूकच नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी एका विधानपरिषद सदस्याचा राजीनामा घेण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. तसेच आपली जागा सोडणार्‍या आमदाराला मुख्यमंत्र्यांची राज्यसभेची जागा मिळणार नाही, हेही काँग्रेसनं स्पष्ट केलं.

जसं प्रदेशाध्यक्ष म्हणतात, त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसनं 9 विधानपरिषद सदस्यांची नाव हायकमांडकडे पाठवली आहेत. यामध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये माणिकराव ठाकरे, उल्हास पवार, राजन तेली आणि एस. क्यु. झमा हे चार सदस्य निवृत्त होता. पण यांच्यापैकी कोणा एकाची जागा घेतली, तर पृथ्वीराज चव्हाण हे केवळ वर्ष-दीड वर्षासाठी मुख्यमंत्री आहेत असा संदेश सर्वत्र जाऊ शकतो. त्यामुळे या चौघांच्या जागा टिकून राहतील असं दिसत आहे.

2014 मध्ये विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड निवृत्त होत आहे. पण या दोघांच्याही राजीनाम्याची शक्यता अनेक अर्थांनी कमी आहे. 2016 पर्यंत मुदत असणा-या दिप्ती चौधरी, हुसेन दलवाई आणि संजय दत्त यांच्याकडे पाच वर्षांचा काळ आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणा एकाला आपली जागा मुख्यमंत्र्यांसाठी सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यात दिप्ती चौधरी महिला आहेत, तर हुसेन दलवाई अल्पसंख्यांक समाजाचे आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठींची मर्जी संपादन केलेल्या संजय दत्त यांचा पत्ता कट होऊ शकेल अशी चर्चा आहे.

आपल्या एका आमदाराला मुख्यमंत्र्यांसाठी जागा सोडण्यास तयार करतानाच प्रदेश काँग्रेसनं दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना आणखी एक वेगळा पर्याय सुचवलेला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार गुरूनाथ कुलकर्णी यांच्या जागेचा. ही जागा राज्यपाल नियुक्त आहे त्यामुळे कुठलीही निवडणूक न होता मुख्यमंत्र्यांना मानाने विधानपरिषदेवर जाता येईल असं प्रदेश काँग्रेसला वाटतं.

पण मुख्यमंत्री प्रदेश काँग्रेसचा हा पर्याय स्वीकारतीलच असं नाही. कारण राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेवर जाणं तितक सं शोभनीय नाही आणि संकेतानाही धरुन नाही. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीवरून काँग्रेस आणि आघाडीमध्ये खरंच मोठा पेच झाला. हा पेच आता कसा सुटतो आणि मुख्यमंत्री कधी आमदार बनतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...