उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात घेणार राहुल गांधींची भेट

उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात घेणार राहुल गांधींची भेट

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशावर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशावर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि उर्मिला मातोंडकर यांचे दिल्ली विमानतळावरील फोटो व्हायरल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोड्याचवेळात उर्मिला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

गेल्या काही दिवासांपासून उर्मिला यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उत्तर मुंबईतून उर्मिला यांना उमेदवारी देऊ शकते. उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याच मतदार संघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही आहे अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? किंवा लोकसभा निवडणूक लढवणार का यासंदर्भात उर्मिला यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण बाबत उर्मिला यांच्या वडिलांची संपर्क केला असता ते म्हणाले, थोड्याच वेळात उर्मिला स्वत: मीडियाशी संवाद करेल.

दरम्यान, काँग्रेस पक्षातील काहींच्या मते उर्मिला यांना पक्षात घेऊन स्टार प्रचारक केले जाऊ शकते. अर्थात उर्मिला यांना नेमकी कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय राहुल गांधी घेतली, असेही सूत्रांनी सांगितले.

VIDEO: 'मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते'

First published: March 27, 2019, 11:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading