नांदेड बॉम्बस्फोटानं हिंदुत्ववादाचा बुरखा फाडला

5 नोव्हेंबर, मुंबईनांदेड बॉम्बस्फोटापासूनच हिंदुत्ववाद्यांनी सुनियोजित बॉम्बस्फोट मालिकांची तयारी सुरू केली होती. या प्रकरणावर आयबीएन लोकमतचा एक्स्लुझिव्ह रिपोर्ट. मालेगावमधील बॉम्बस्फोटामुळे हिंदू दहशतवादाचा चेहरा उघड झाला असला तरी या बॉम्बस्फोटाची तयारी हिंदुत्ववादी अतिरेकी विचारसरणीचा ' थिंक टँक ' 2003 सालापासून करत होता. आयबीएन-लोकमतच्या हाती लागलेल्या पोलिसांकडील कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होतं आहे. विशेष म्हणजे, या काळात केंद्रात सत्ता भारतीय जनता पक्षाची होती. या दहशतवादाला एक नैतिक कारणही देण्यात आलं होतं आणि ते म्हणजे इस्लामी दहशतवादाचा मुकाबला करणं. नांदेड बॉम्बस्फोटानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याप्रकरणातील एक आरोपी असलेल्या राहूल पांडेच्या नार्को अ‍ॅनालिसिस टेस्टमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नांदेड स्फोटाच्या तपासात राहुलने अनेक अशा गोष्टी सांगितल्या, त्यावरुन हिंदू दहशतवादाचा बुरखा फाटला गेला. हिमांशू पानसे हा नांदेडमध्ये राहणारा बजरंग दलाचा पदाधिकारी 6 एप्रिल 2006 रोजी बॉम्ब बनवत असताना स्फोट होऊन ठार झाला. बॉम्बस्फोट झाला, तेव्हा राहुल हा हिमांशू पानसेसोबत होता. तो वाचला पण त्याचा हात फ्रॅक्चर झाला. हिमांशू हाच या टोळीचा नेता होता. हिमांशूचा नेता योगेश देशपांडे होता. जालना, पूर्णा, परभणीत मशिदींजवळ बॉम्बस्फोट झाले, त्याचं प्लानिंग हिंमांशूचं होतं. जालन्यात बॉम्बस्फोट घडवण्याच्या वेळी राहुल हिमांशू सोबत होता. हिमांशूला वाराणसीचा विहिंपचा नेता मुलाना आणि मुकेश हे मदत करायचे. नांदेडमधील गोविंद पुराणिक हा आरएसएसचा नेता मदत करायचा. हिमांशूला बॉम्ब तयार करण्याचं ट्रेनिंग दोघांनी दिलं. त्यापैकी एक होता पुण्याचा मिथून चक्रवर्ती. सिंहगडाच्या पायथ्याशी या बॉम्बची चाचणीही घेण्यात आली होती. हिमांशू पानसे आणि त्याच्या टोळीला दोन बॉम्बस्फोट करायचे होते. एक गुढीपाडव्याच्या दिवशी आणि दुसरा ईदच्या दिवशी. तोही औरंगाबादेत मशिदीच्या बाहेर. हा प्लॉन सफल झाला नाही, कारण बॉम्ब बनवतानाच तो फुटला. हिमांशू ठार झाला. सोबत ज्याच्या घरात हा बॉम्ब बनत होता, तो नरेश राजकोंडावारही ठार झाला. औरंगाबाद मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न 2006 मध्ये असफल ठरला. पण दोन वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिनं तो मालेगावमध्ये तडीस नेला. संघपरिवारानं अशातर्‍हेनं आपली योजना अंमलात आणलीच.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2008 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading