अन्न आणि नागरी पुरवठा खात सोनवणे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत - तावडे

27 जानेवारी'फरनेस ऑईल वाहून नेण्यासंदर्भातला एक आदेश तेल माफियांना ताकद देण्यासाठी कारणीभूत ठरला' त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न आणि नागरी पुरवठा खातच यशवंत सोनवणे यांच्या मृत्यूसाठी अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरते. असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला. 24 जानेवारी 2011 ला म्हणजे यशवंत सोनवणे यांची हत्या होण्याच्या आदल्या दिवशी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे उपसचिव डि.बी.पारखी यांनी एक आदेश काढला आहे. त्यानुसार फरनेस ऑईलच्या वाहतुकीची तपासणी करण्याचे अधिकार प्रत्येक जिल्हयाच्या पुरवठा अधिकार्‍यांकडेच ठेवले गेले. याअगोदर अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागातील पोलिस स्टेशन यांनाच हे अधिकार होते पण या आदेशामुळे यशवंत सोनावणे यांना असलेल्या टँकरची चौकशी करण्याचा अधिकार रद्द झाला. असा निर्णय घेण्यामागे 25 कोटी रूपये मंत्रालयातील काही मजल्यावर लाच म्हणून दिले गेल्याचा आरोप तावडे यांनी केला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2011 04:48 PM IST

अन्न आणि नागरी पुरवठा खात सोनवणे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत - तावडे

27 जानेवारी

'फरनेस ऑईल वाहून नेण्यासंदर्भातला एक आदेश तेल माफियांना ताकद देण्यासाठी कारणीभूत ठरला' त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न आणि नागरी पुरवठा खातच यशवंत सोनवणे यांच्या मृत्यूसाठी अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरते. असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला. 24 जानेवारी 2011 ला म्हणजे यशवंत सोनवणे यांची हत्या होण्याच्या आदल्या दिवशी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे उपसचिव डि.बी.पारखी यांनी एक आदेश काढला आहे. त्यानुसार फरनेस ऑईलच्या वाहतुकीची तपासणी करण्याचे अधिकार प्रत्येक जिल्हयाच्या पुरवठा अधिकार्‍यांकडेच ठेवले गेले. याअगोदर अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागातील पोलिस स्टेशन यांनाच हे अधिकार होते पण या आदेशामुळे यशवंत सोनावणे यांना असलेल्या टँकरची चौकशी करण्याचा अधिकार रद्द झाला. असा निर्णय घेण्यामागे 25 कोटी रूपये मंत्रालयातील काही मजल्यावर लाच म्हणून दिले गेल्याचा आरोप तावडे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...