VIDEO प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नये, देवबंदच्या सूचनेने वाद

VIDEO प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नये, देवबंदच्या सूचनेने वाद

'प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व ठिकाणी नाकेबंदी असते आणि तपासणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकारण त्रास होण्याची शक्यता आहे.'

  • Share this:

लखनऊ 21 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दारुल उलूम च्या विद्यार्थ्यांनी प्रवास करू नये अशी सूचना दारुल उलूम देवबंद ने आपल्या विद्यार्थ्यांना दिली आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेत यावं किंवा घरीच राहावं असं आवाहन संस्थे तर्फे करण्यात आलंय. देवबंदच्या या आवाहनामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व ठिकाणी नाकेबंदी असते आणि तपासणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकारण त्रास होण्याची शक्यता आहे. अनेकदा कारण नसताना चौकशीला सामोरे जाण्याची वेळ येते, अनेकदा अटकही केली जाते त्यामुळे वाद टाळण्यासाठी मुलांनी जास्त फिरू नये असं आवाहनही संस्थेने केले आहे.

या काळात कुणाशी वाद घालू नका आणि युक्तिवादही करू नका असंही संस्थेने आपल्या मुलांना बजावलं आहे. दारुलच्या या घोषणेवर आता टीका होत आहे. अशा प्रकारची घोषणा करून दारुल तरुणांच्या मनात भीती निर्माण करत आहे. जे दोषी नाहीत त्यांना घाबरण्याचं कारण नाही असं प्रशासनाने स्पष्ट केलंय.

कुठल्याही विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात नाही. सुरक्षेच्या दृष्टिने जे काही करायचं असतं त्याच उपाययोजना याही वर्षी केल्या जातील असं प्रशासनाने स्पष्ट केलंय. तर फक्त शांतता राहावी अनुचित प्रकार घडू नये यासाठीच अशी घोषणा केल्याचं स्पष्टिकरण दारुलचे मुफ्ती असद कासमी यांनी दिलं आहे.

Tags:
First Published: Jan 21, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading