फरार संघ प्रचारकांची माहिती देणार्‍याला 10 लाखांचं बक्षिस

फरार संघ प्रचारकांची माहिती देणार्‍याला 10 लाखांचं बक्षिस

11 जानेवारीसमझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातल्या फरारी आरोपींची माहिती देणार्‍याला 10 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा नॅशनल इन्वेस्टिगेटीव्ह एजन्सीनं केली. त्यातले संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांगरे हे संघाचे प्रचारक आहेत. त्यांनीच बॉम्ब बनवला होता असा पोलिसांना संशय आहे. तर अशोक नावाच्या तिसर्‍या संशयिताची माहिती देणार्‍याला 2 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय. स्वामी असीमानंदचा कबुलीजबाब आता सीबीआय आणि एनआयएसाठी महत्त्वाचं हत्यार बनलंय. या कबुलीजबाबानंतर मालेगाव, अजमेर, मक्का मस्जीद आणि समझौता एक्सप्रेस, बॉम्बस्फोटप्रकरणांच्या चौकशीला वेग येणार आहे. पण तपासातलं सर्वात मोठं आवाहन आहे ते फरार आरोपींना पकडनं. रामजी कलसांगरे आणि संदीप डांगे या दोघांना पकडण्यासाठी आता एनआयएनं रोख बक्षिसाची घोषणा केली.स्वामी असीमानंदनं कबुली दरम्यान या दोघांची नावं घेतली होती. हे दोघेही सुनील जोशीच्या जवळचे असल्याची माहिती असिमानंदनं दिली. दरम्यान राजस्थान एटीएसनं या दोघांना आरोपी म्हणून घोषीत केलंय.अजमेर बॉम्बस्फोटांच्या आरोपपत्रात या दोघांची नावं आहेत.तर तिसरा दुवा आहे अशोक. या अशोकला प्रीन्स म्हणूनही ओळखला जातो. याला पकडून देणार्‍यालाही रोख बक्षिस देण्यात येणार आहे.या तिघांबरोबरचं आणखी काही महत्वाचे दुवे आहेत.भरत रतेश्वर आणि जयंतीभाई केवट हे दोघेही या प्रकरणांच्या तपासात महत्वाचे ठरणार आहेत. हे दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. भरत रतेश्वर हा सुनील जोशीबरोबर, झारखंडला गेला होता.तिथं त्यांनी सीम कार्ड्स मिळवले. हे सीम कार्ड्स अजमेर आणि मक्का मशीद बॉम्बस्फोटांमध्ये वापरण्यात आले होते. रतेश्वरला एनआयएनं ताब्यात घेतलं. तर जयंतीभाईनं अतिरेकी कारवायांसाठी आर्थिक मदत केली होती.अशी कबुली असीमानंदनं दिली. तर जयंतीभाईनं आपणं कुठल्याही कारवाईत सहभागी नसल्याचा दावा केला. आता खरी कसोटी लागणार आहे, ती सीबीआय आणि एनआयएची कारण हे फरार आरोपी जाळ्यात आल्याशिवाय ते एक ठोस केस उभी करु शकणार नाहीत.संशयित संघ स्वयंसेवक..1. इंद्रेश कुमार - ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्या संघ प्रचारकांचा मार्गदर्शक आणि त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍याची जबाबदारी 2. सुनील जोशी - वेगवेगळ्या राज्यांमध्ये दहशतीचं नेटवर्क तयार केलं. दोन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी 2006 मध्ये संघातून निलंबित गेल्यावर्षी झाला संशयास्पद मृत्यू3. संदीप डांगे - वरिष्ठ संघ प्रचारक, मुस्लिम भागांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट कटातील महत्त्वाचा सूत्रधार सध्या फरारी4. रामचंद्र कलसंगरे - संघ प्रचारक, प्रत्यक्ष बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी, सध्या फरारी5. कर्नल श्रीकांत पुरोहित - 'अभिनव भारत'चे संस्थापक सदस्य, लष्करी अधिकार्‍यांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवण्याची जबाबदारी6. देवेंद्र गुप्ता - मुझफ्फरपूरचे संघाचे विभाग प्रचारक, बॉम्बस्फोट घडवण्यार्‍या संघ प्रचारकांची व्यवस्था आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी7. लोकेश शर्मा - मक्का मस्जिद आणि अजमेर शरीफ मधील बॉम्बस्फोटांसाठी दोन नोकिया हँडसेट्सची खरेदी8. योगी आदित्यनाथ - भाजपचे गोरखपूरचे खासदार, असिमानंदनी योगींकडे दहशतवादी कारवायांसाठी पैशांची मागणी केली होती. आदित्यनाथ यांनी फारशी मदत केली नाही पण नेहमीच संशयाच्या भोवर्‍यात पाकिस्तानची मागणी फेटाळलीदरम्यान समझौता बॉम्बस्फोटाच्या तपासाची माहिती देण्याची पाकिस्तानची मागणी भारत सरकारनं फेटाळली. या प्रकरणाचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सी अजून करत आहे. त्यामुळे आताच त्याची माहिती देणं घाईचं होईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं.तसा संदेश पाकिस्तानला द्या अशी सूचनाही गृहमंत्रालयानं परराष्ट्र मंत्रालयाला केली. स्वामी असीमानंद यानं स्फोटात संघाच्या काही नेत्यांचे संबंध असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या राजदुताला समन्स बजावून स्फोटाच्या तपासाची माहिती मागवली होती. काँग्रेसचा हा घोटाळ्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न - गडकरीस्वामी असिमानंद यानं गुन्ह्याची कबुली दिली असली तरी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेसला फटकारलं. काँग्रेस घोटाळ्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

  • Share this:

11 जानेवारी

समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातल्या फरारी आरोपींची माहिती देणार्‍याला 10 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा नॅशनल इन्वेस्टिगेटीव्ह एजन्सीनं केली. त्यातले संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांगरे हे संघाचे प्रचारक आहेत. त्यांनीच बॉम्ब बनवला होता असा पोलिसांना संशय आहे. तर अशोक नावाच्या तिसर्‍या संशयिताची माहिती देणार्‍याला 2 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय.

स्वामी असीमानंदचा कबुलीजबाब आता सीबीआय आणि एनआयएसाठी महत्त्वाचं हत्यार बनलंय. या कबुलीजबाबानंतर मालेगाव, अजमेर, मक्का मस्जीद आणि समझौता एक्सप्रेस, बॉम्बस्फोटप्रकरणांच्या चौकशीला वेग येणार आहे. पण तपासातलं सर्वात मोठं आवाहन आहे ते फरार आरोपींना पकडनं. रामजी कलसांगरे आणि संदीप डांगे या दोघांना पकडण्यासाठी आता एनआयएनं रोख बक्षिसाची घोषणा केली.स्वामी असीमानंदनं कबुली दरम्यान या दोघांची नावं घेतली होती. हे दोघेही सुनील जोशीच्या जवळचे असल्याची माहिती असिमानंदनं दिली. दरम्यान राजस्थान एटीएसनं या दोघांना आरोपी म्हणून घोषीत केलंय.अजमेर बॉम्बस्फोटांच्या आरोपपत्रात या दोघांची नावं आहेत.तर तिसरा दुवा आहे अशोक. या अशोकला प्रीन्स म्हणूनही ओळखला जातो. याला पकडून देणार्‍यालाही रोख बक्षिस देण्यात येणार आहे.या तिघांबरोबरचं आणखी काही महत्वाचे दुवे आहेत.

भरत रतेश्वर आणि जयंतीभाई केवट हे दोघेही या प्रकरणांच्या तपासात महत्वाचे ठरणार आहेत. हे दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. भरत रतेश्वर हा सुनील जोशीबरोबर, झारखंडला गेला होता.तिथं त्यांनी सीम कार्ड्स मिळवले. हे सीम कार्ड्स अजमेर आणि मक्का मशीद बॉम्बस्फोटांमध्ये वापरण्यात आले होते. रतेश्वरला एनआयएनं ताब्यात घेतलं. तर जयंतीभाईनं अतिरेकी कारवायांसाठी आर्थिक मदत केली होती.अशी कबुली असीमानंदनं दिली. तर जयंतीभाईनं आपणं कुठल्याही कारवाईत सहभागी नसल्याचा दावा केला. आता खरी कसोटी लागणार आहे, ती सीबीआय आणि एनआयएची कारण हे फरार आरोपी जाळ्यात आल्याशिवाय ते एक ठोस केस उभी करु शकणार नाहीत.

संशयित संघ स्वयंसेवक..

1. इंद्रेश कुमार - ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्या संघ प्रचारकांचा मार्गदर्शक आणि त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍याची जबाबदारी

2. सुनील जोशी - वेगवेगळ्या राज्यांमध्ये दहशतीचं नेटवर्क तयार केलं. दोन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी 2006 मध्ये संघातून निलंबित गेल्यावर्षी झाला संशयास्पद मृत्यू

3. संदीप डांगे - वरिष्ठ संघ प्रचारक, मुस्लिम भागांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट कटातील महत्त्वाचा सूत्रधार सध्या फरारी

4. रामचंद्र कलसंगरे - संघ प्रचारक, प्रत्यक्ष बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी, सध्या फरारी

5. कर्नल श्रीकांत पुरोहित - 'अभिनव भारत'चे संस्थापक सदस्य, लष्करी अधिकार्‍यांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवण्याची जबाबदारी

6. देवेंद्र गुप्ता - मुझफ्फरपूरचे संघाचे विभाग प्रचारक, बॉम्बस्फोट घडवण्यार्‍या संघ प्रचारकांची व्यवस्था आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

7. लोकेश शर्मा - मक्का मस्जिद आणि अजमेर शरीफ मधील बॉम्बस्फोटांसाठी दोन नोकिया हँडसेट्सची खरेदी

8. योगी आदित्यनाथ - भाजपचे गोरखपूरचे खासदार, असिमानंदनी योगींकडे दहशतवादी कारवायांसाठी पैशांची मागणी केली होती. आदित्यनाथ यांनी फारशी मदत केली नाही पण नेहमीच संशयाच्या भोवर्‍यात

पाकिस्तानची मागणी फेटाळली

दरम्यान समझौता बॉम्बस्फोटाच्या तपासाची माहिती देण्याची पाकिस्तानची मागणी भारत सरकारनं फेटाळली. या प्रकरणाचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सी अजून करत आहे. त्यामुळे आताच त्याची माहिती देणं घाईचं होईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं.तसा संदेश पाकिस्तानला द्या अशी सूचनाही गृहमंत्रालयानं परराष्ट्र मंत्रालयाला केली. स्वामी असीमानंद यानं स्फोटात संघाच्या काही नेत्यांचे संबंध असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या राजदुताला समन्स बजावून स्फोटाच्या तपासाची माहिती मागवली होती.

काँग्रेसचा हा घोटाळ्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न - गडकरी

स्वामी असिमानंद यानं गुन्ह्याची कबुली दिली असली तरी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेसला फटकारलं. काँग्रेस घोटाळ्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

Tags:
First Published: Jan 11, 2011 05:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading