मालमत्ता वाचवण्यासाठी संजय दत्तची हायकोर्टात धाव

07 जानेवारीअभिनेता संजय दत्त याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. याविरोधात संजय दत्त यानं आज मुंबई हायकोर्टात अपील दाखल केली आहे. निर्माता शकिल नुरानी च्या 'जॉन की बाजी' या सिनेमाचं शूटिंग संजय दत्तनं अपूर्ण सोडलं होतं. दोन ते तीन शुटिंग झाल्यानंतर संजय दत्त याने चित्रपटासाठी तारखा देण्यास टाळाटाळ केली. याबाबत शकिल नुरानी याने 2009 सालात इंडियन मोशन पिश्चर असोशिएशन अर्था इम्पा याच्याकडे तक्रार केली होती. इम्पाने संजय दत्त याला सुनावणीसाठी बोलावून ही तो हजर झाला नाही. यामुळे अखेर 28 जानेवारी 2010 रोजी इम्पाने संजय दत्त याने नुरानी यांना दोन कोटी तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तसंच घेतलेले पन्नास लाख रुये परत करावे अशी आँर्डर केली होती. हे पैसे शकिल यांना एक वर्षाच्या आत मिळाले नाही तर संजय दत्त यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात येईल असं ही आँर्डर मध्ये म्हटलं होतं. एक वर्ष उलटल्यानंतर ही सजंय दत्त याने पैसे न दिल्याने अखेर त्याची मालमत्ता जप्त करण्या बाबत कार्यवाही झाली होती. यानंतर आता संजय दत्त याने मुंबई हायकोर्टात अपील दाखल केलं आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2011 05:10 PM IST

मालमत्ता वाचवण्यासाठी संजय दत्तची हायकोर्टात धाव

07 जानेवारी

अभिनेता संजय दत्त याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. याविरोधात संजय दत्त यानं आज मुंबई हायकोर्टात अपील दाखल केली आहे. निर्माता शकिल नुरानी च्या 'जॉन की बाजी' या सिनेमाचं शूटिंग संजय दत्तनं अपूर्ण सोडलं होतं. दोन ते तीन शुटिंग झाल्यानंतर संजय दत्त याने चित्रपटासाठी तारखा देण्यास टाळाटाळ केली. याबाबत शकिल नुरानी याने 2009 सालात इंडियन मोशन पिश्चर असोशिएशन अर्था इम्पा याच्याकडे तक्रार केली होती. इम्पाने संजय दत्त याला सुनावणीसाठी बोलावून ही तो हजर झाला नाही. यामुळे अखेर 28 जानेवारी 2010 रोजी इम्पाने संजय दत्त याने नुरानी यांना दोन कोटी तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तसंच घेतलेले पन्नास लाख रुये परत करावे अशी आँर्डर केली होती. हे पैसे शकिल यांना एक वर्षाच्या आत मिळाले नाही तर संजय दत्त यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात येईल असं ही आँर्डर मध्ये म्हटलं होतं. एक वर्ष उलटल्यानंतर ही सजंय दत्त याने पैसे न दिल्याने अखेर त्याची मालमत्ता जप्त करण्या बाबत कार्यवाही झाली होती. यानंतर आता संजय दत्त याने मुंबई हायकोर्टात अपील दाखल केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...