स्वामी असीमानंद यांची कबुली ; संघ अडचणीत

स्वामी असीमानंद यांची कबुली ; संघ अडचणीत

07 जानेवारी2007 मध्ये समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेता स्वामी असीमानंद यानं आपल्या गुन्ह्याची सीबीआयसमोर कबुली दिली. आयबीएन-नेटवर्क आणि तहलकाला त्याचा हा कबुलीजबाब मिळाला. 2007 मध्ये समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 68 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त होती. या बॉम्बस्फोटांत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला संशय होता. त्याप्रकरणी असीमानंदन यांनी दिलेला कबुलीजबाब संघाला अडचणीत आणणारा आहे. अत्याचार होत असताना हिंदू शांत बसून बघू शकत नाहीत असं असीमानंद यानं कबुलीत म्हटलं आहे. तसंच मक्का मस्जीद आणि अजमेर बॉम्बस्फोटाशी संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचा संबंध असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. शिवाय साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, सुनील जोशी आणि इंद्रेश कुमारसह इतरांचा देशभरात स्फोट घडवण्याचा कसा कट होता हेसुद्धा असीमानंद यांनी सांगितलं. त्यामुळे संघ अडचणीत आला. असीमानंद यानं कलम 164 अंतर्गत आपला कबुलीजबाब दिला. बॉम्बचं उत्तर बॉम्बनंच द्यायला हवं असं आपण प्रत्येकाला सांगितलं. काय आहे या कबुली जबाबात?-असीमानंदानं कलम 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर निवेदन दिलं-हे निवेदन पुरावा म्हणून वापरता येतं.-असीमानंदानं, साध्वी प्रज्ञा, सुनिल जोशी, इंद्रेश कुमार आणि इतर दहशतवादी हल्ल्यांचं कसं काम करत होते ते दाखवलं आहे.'प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर स्फोट आपल्याच माणसांनी केला, असं मला सुनील जोशी सांगत होता. 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी सुनील जोशीचा मृत्यू झाला होता. पण मला मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव बॉम्बस्फोटसुद्धा आमच्याच माणसांनी केला. सुनील जेव्हा जिवंत होता तेव्हा आम्ही सगळ्या बॉम्बस्फोटांची योजना आखली. मला आता या सगळ्याचा पश्चात्ताप होतो. आम्ही केलं ते चुकीचं होतं म्हणूनच मी हा कबुलीजबाब देतोय.' असीमानंद यांची कबुली : त्यांनी बॉम्बस्फोट का केले ?'2002 नंतर मुस्लिमांनी अनेक हिंदू मंदिरांमध्ये बॉम्बस्फोट केले. मी याबाबत प्रज्ञासिंग आणि सुनील जोशी यांच्याशी चर्चा करायचो. या सगळ्या प्रकारामुळे तेही माझ्यासारखेचं अस्वस्थ होते. जून 2006 मध्ये संकटमोचन मंदिरावर हल्ला झाला आणि आम्ही भारतीभाईंच्या वलसाडच्या घरी बैठक घेतली. या बैठकीला मी, भारतीभाई, प्रज्ञा ठाकूर आणि सुनील जोशी हजर होतो. आणखी 4 जण होते. रामजी, लोकेश शर्मा आणि अमित. या बैठकीत मी सगळ्यांना सांगितलं. बॉम्बचं उत्तर बॉम्बनीचं दिलं पाहिजे. हिंदूंनी आता शांत बसून चालणार नाही.' 'आम्ही ठरवलं की सुनील जोशी आणि भारतीभाई झारखंडला जातील आणि तिथं सीमकार्ड्स आणि पिस्तूल मिळवतील. आग्रा आणि गोरखपूरलाही जा. गोरखपूरला योगी आदित्यनाथांची भेट घ्या तर आग्रा इथं राजेश्वर सिंगची भेट घ्या असा सल्ला मी दिला. मी स्वत: सुनील जोशीला 25 हजार रुपये दिले. या सगळ्या खरेदीसाठी ते एप्रिल 2006 मध्ये बाहेर पडले.''मालेगावमध्ये 80 टक्के मुस्लीम आहेत, त्यामुळे मालेगावपासून सुरुवात करूया असा सल्ला मी दिला आणि पहिला बॉम्बस्फोट मालेगावला केला. हैदराबादच्या निझामांना पाकिस्तानचा फार पुळका म्हणून हैदराबादची निवड केली. अजमेर शरीफच्या दर्ग्यावर खूप हिंदू जातात म्हणून मी सल्ला दिला की तिथं बॉम्बस्फोट घडवू म्हणजे घाबरून हिंदू तिकडे जाणार नाहीत. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात अनेक तरुण मुस्लीम शिकतात, म्हणून अलिगढ मुस्लीम विद्यापीठातही बॉम्बस्फोट करण्याचा मी सल्ला दिला. माझा सल्ला सगळ्यांनी मान्य केला आणि सगळ्या ठिकाणांवर बॉम्बस्फोट करण्याचा निर्णय आम्ही घेतला.''या सगळ्या जागांची रेकी करायला पाहिजे असा सल्ला सुनील जोशीनं दिला. समझोता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट करायचा सल्ला सुनील जोशीनंच दिला. तो म्हणाला की, समझोता एक्स्प्रेसमधून फक्त पाकिस्तानीच प्रवास करतात तेव्हा आपण समझोता एक्स्प्रेसवरही हल्ला केला पाहिजे आणि सुनील जोशीनं स्वत: याची जबाबदारी घेतली.'असीमानंदच्या या कबुलीमुळे या सगळ्या बॉम्बस्फोटांच्या तपासात असीमानंद अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला पण या कबुलीजबाबामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी वाढणार एवढं मात्र नक्की.

  • Share this:

07 जानेवारी

2007 मध्ये समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेता स्वामी असीमानंद यानं आपल्या गुन्ह्याची सीबीआयसमोर कबुली दिली. आयबीएन-नेटवर्क आणि तहलकाला त्याचा हा कबुलीजबाब मिळाला. 2007 मध्ये समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 68 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त होती. या बॉम्बस्फोटांत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला संशय होता. त्याप्रकरणी असीमानंदन यांनी दिलेला कबुलीजबाब संघाला अडचणीत आणणारा आहे. अत्याचार होत असताना हिंदू शांत बसून बघू शकत नाहीत असं असीमानंद यानं कबुलीत म्हटलं आहे. तसंच मक्का मस्जीद आणि अजमेर बॉम्बस्फोटाशी संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचा संबंध असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. शिवाय साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, सुनील जोशी आणि इंद्रेश कुमारसह इतरांचा देशभरात स्फोट घडवण्याचा कसा कट होता हेसुद्धा असीमानंद यांनी सांगितलं. त्यामुळे संघ अडचणीत आला. असीमानंद यानं कलम 164 अंतर्गत आपला कबुलीजबाब दिला. बॉम्बचं उत्तर बॉम्बनंच द्यायला हवं असं आपण प्रत्येकाला सांगितलं.

काय आहे या कबुली जबाबात?

-असीमानंदानं कलम 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर निवेदन दिलं-हे निवेदन पुरावा म्हणून वापरता येतं.-असीमानंदानं, साध्वी प्रज्ञा, सुनिल जोशी, इंद्रेश कुमार आणि इतर दहशतवादी हल्ल्यांचं कसं काम करत होते ते दाखवलं आहे.

'प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर स्फोट आपल्याच माणसांनी केला, असं मला सुनील जोशी सांगत होता. 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी सुनील जोशीचा मृत्यू झाला होता. पण मला मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव बॉम्बस्फोटसुद्धा आमच्याच माणसांनी केला. सुनील जेव्हा जिवंत होता तेव्हा आम्ही सगळ्या बॉम्बस्फोटांची योजना आखली. मला आता या सगळ्याचा पश्चात्ताप होतो. आम्ही केलं ते चुकीचं होतं म्हणूनच मी हा कबुलीजबाब देतोय.'

असीमानंद यांची कबुली : त्यांनी बॉम्बस्फोट का केले ?

'2002 नंतर मुस्लिमांनी अनेक हिंदू मंदिरांमध्ये बॉम्बस्फोट केले. मी याबाबत प्रज्ञासिंग आणि सुनील जोशी यांच्याशी चर्चा करायचो. या सगळ्या प्रकारामुळे तेही माझ्यासारखेचं अस्वस्थ होते. जून 2006 मध्ये संकटमोचन मंदिरावर हल्ला झाला आणि आम्ही भारतीभाईंच्या वलसाडच्या घरी बैठक घेतली. या बैठकीला मी, भारतीभाई, प्रज्ञा ठाकूर आणि सुनील जोशी हजर होतो. आणखी 4 जण होते. रामजी, लोकेश शर्मा आणि अमित. या बैठकीत मी सगळ्यांना सांगितलं. बॉम्बचं उत्तर बॉम्बनीचं दिलं पाहिजे. हिंदूंनी आता शांत बसून चालणार नाही.' 'आम्ही ठरवलं की सुनील जोशी आणि भारतीभाई झारखंडला जातील आणि तिथं सीमकार्ड्स आणि पिस्तूल मिळवतील. आग्रा आणि गोरखपूरलाही जा. गोरखपूरला योगी आदित्यनाथांची भेट घ्या तर आग्रा इथं राजेश्वर सिंगची भेट घ्या असा सल्ला मी दिला. मी स्वत: सुनील जोशीला 25 हजार रुपये दिले. या सगळ्या खरेदीसाठी ते एप्रिल 2006 मध्ये बाहेर पडले.'

'मालेगावमध्ये 80 टक्के मुस्लीम आहेत, त्यामुळे मालेगावपासून सुरुवात करूया असा सल्ला मी दिला आणि पहिला बॉम्बस्फोट मालेगावला केला. हैदराबादच्या निझामांना पाकिस्तानचा फार पुळका म्हणून हैदराबादची निवड केली. अजमेर शरीफच्या दर्ग्यावर खूप हिंदू जातात म्हणून मी सल्ला दिला की तिथं बॉम्बस्फोट घडवू म्हणजे घाबरून हिंदू तिकडे जाणार नाहीत. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात अनेक तरुण मुस्लीम शिकतात, म्हणून अलिगढ मुस्लीम विद्यापीठातही बॉम्बस्फोट करण्याचा मी सल्ला दिला. माझा सल्ला सगळ्यांनी मान्य केला आणि सगळ्या ठिकाणांवर बॉम्बस्फोट करण्याचा निर्णय आम्ही घेतला.'

'या सगळ्या जागांची रेकी करायला पाहिजे असा सल्ला सुनील जोशीनं दिला. समझोता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट करायचा सल्ला सुनील जोशीनंच दिला. तो म्हणाला की, समझोता एक्स्प्रेसमधून फक्त पाकिस्तानीच प्रवास करतात तेव्हा आपण समझोता एक्स्प्रेसवरही हल्ला केला पाहिजे आणि सुनील जोशीनं स्वत: याची जबाबदारी घेतली.'

असीमानंदच्या या कबुलीमुळे या सगळ्या बॉम्बस्फोटांच्या तपासात असीमानंद अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला पण या कबुलीजबाबामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी वाढणार एवढं मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 05:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading