नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन

02 जानेवारीकपिल भास्कर, नाशिकनाशिकच्या थंडीचे आकर्षण काही आगळ्यावेगळ्या पर्यटकांनांही पडतं. ते पर्यटक म्हणजे उत्तरेतून अनेक मैल स्थलांतर करून येणारे पक्षी. नांदूरमाध्यमेश्वरच्या पक्षी अभयारण्यात या परदेशी पाहुण्यांची गर्दी होते.नेहमी पुस्तकातल्या चित्रात पाहायला मिळणारे अनेक पक्षी प्रत्यक्षात पाहायला मिळणं हा एक उत्सवच होता. निमित्त होतं नांदूरमाध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण सहलीचं. ब्राह्मणी बदक, परपल हेरॉन, चांदवा, नकटा एकापेक्षा एक अद्भूत पक्षी. कुणी सैबेरियातून आलेले, कुणी युरोपातून या रंगीत पाहुण्यांना पाहून चिमुकलेही हरखून गेले.नाशिकच्या शाळांमधल्या मुलांना या सहलीचं आयोजन नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेच्या वतीनं केले जात आहे. फक्त विद्यार्थीच नाही, तर नाशिकबाहेरचे पर्यटकही याठिकाणी आवर्जून हजेरी लावताहेत.अडीचशेच्या वर जातींचे हे पाहुणे आता या पाणथळ दलदलीचा पाहुणाचर घेण्यासाठी पाहुणाचार घेण्यासाठी नांदूरमाध्यमेश्वरी मुक्कामी असतील.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2011 10:44 AM IST

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन

02 जानेवारी

कपिल भास्कर, नाशिक

नाशिकच्या थंडीचे आकर्षण काही आगळ्यावेगळ्या पर्यटकांनांही पडतं. ते पर्यटक म्हणजे उत्तरेतून अनेक मैल स्थलांतर करून येणारे पक्षी. नांदूरमाध्यमेश्वरच्या पक्षी अभयारण्यात या परदेशी पाहुण्यांची गर्दी होते.

नेहमी पुस्तकातल्या चित्रात पाहायला मिळणारे अनेक पक्षी प्रत्यक्षात पाहायला मिळणं हा एक उत्सवच होता. निमित्त होतं नांदूरमाध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण सहलीचं. ब्राह्मणी बदक, परपल हेरॉन, चांदवा, नकटा एकापेक्षा एक अद्भूत पक्षी. कुणी सैबेरियातून आलेले, कुणी युरोपातून या रंगीत पाहुण्यांना पाहून चिमुकलेही हरखून गेले.

नाशिकच्या शाळांमधल्या मुलांना या सहलीचं आयोजन नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेच्या वतीनं केले जात आहे. फक्त विद्यार्थीच नाही, तर नाशिकबाहेरचे पर्यटकही याठिकाणी आवर्जून हजेरी लावताहेत.अडीचशेच्या वर जातींचे हे पाहुणे आता या पाणथळ दलदलीचा पाहुणाचर घेण्यासाठी पाहुणाचार घेण्यासाठी नांदूरमाध्यमेश्वरी मुक्कामी असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...