राज ठाकरे यांच्या भेटीने शिवसेनाप्रमुख भाजपवर नाराज

20 डिसेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप कार्यालयात हजेरी लावली. या भेटीचं खरं कारण अजून गुलदस्त्यात आहे. तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या भेटीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आपण लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चा करणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.या भेटीनंतर मात्र युतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. शिवसेनेने या भेटीवर मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खुद्द या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. ज्या राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर उघडपणे टीका केली त्यांना भाजप नेते कसे भेटतात असा थेट सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. तसेच भाजप नेते शिवसेनेला कायम गृहीत धरतात असा आरोपही शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केला. दरम्यान भाजप कार्यालयाला भेट देण्याचे आमंत्रण भाजप नेत्यांनाची राज ठाकरेंना दिलं होते असं स्पष्टीकरण शिरीष पारकर यांनी आयबीएन लोकमतवर बोलताना केलं. काँग्रेसच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याबाबतची एक बैठक प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. आणि अचानक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची या कार्यालयात एंट्री होते. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तब्बल अर्ध्या तासानंतर राज बाहेर आले आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता निघुन गेले.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप कार्यालयात भेट दिली तेव्हा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, मधु चव्हाण, माधव भंडारी कार्यालयात उपस्थित होते. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात ही चर्चा झाली. आणि बीएमसी निवडणूकीच्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2010 03:49 PM IST

राज ठाकरे यांच्या भेटीने शिवसेनाप्रमुख भाजपवर नाराज

20 डिसेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप कार्यालयात हजेरी लावली. या भेटीचं खरं कारण अजून गुलदस्त्यात आहे. तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या भेटीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आपण लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चा करणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

या भेटीनंतर मात्र युतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. शिवसेनेने या भेटीवर मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खुद्द या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. ज्या राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर उघडपणे टीका केली त्यांना भाजप नेते कसे भेटतात असा थेट सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. तसेच भाजप नेते शिवसेनेला कायम गृहीत धरतात असा आरोपही शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केला.

दरम्यान भाजप कार्यालयाला भेट देण्याचे आमंत्रण भाजप नेत्यांनाची राज ठाकरेंना दिलं होते असं स्पष्टीकरण शिरीष पारकर यांनी आयबीएन लोकमतवर बोलताना केलं.

काँग्रेसच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याबाबतची एक बैठक प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. आणि अचानक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची या कार्यालयात एंट्री होते. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तब्बल अर्ध्या तासानंतर राज बाहेर आले आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता निघुन गेले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप कार्यालयात भेट दिली तेव्हा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, मधु चव्हाण, माधव भंडारी कार्यालयात उपस्थित होते. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात ही चर्चा झाली. आणि बीएमसी निवडणूकीच्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...