मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह

अलका धुपकर, मुंबई16 नोव्हेंबरमुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांची कुलगुरुपदी निवड होऊन चार महिने झाले आहेत. तरीही त्यांच्या पात्रतेबाबतचा वाद अजूनही सुरुच आहे. आता माहिती अधिकार कायद्याखाली काही प्राध्यापकांनी कुलगुरुंच्या निवडप्रक्रियेतील कागदपत्र मिळवली आहे. आणि कुलगुरुंपेक्षा संशोधनाचा अधिक अनुभव असलेल्या उमेदवारांना कसे डावलण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे.डॉ. राजन वेळूकर यांनी कुलगुरु पदाच्या उमेदवारी अर्जामध्ये आपले 12 रिसर्चपेपर प्रसिद्ध झाले असल्याचा दावा केला. नियमानुसार संशोधन आणि अकॅडमिक क्षेत्रात मान्यताप्राप्त असलेल्या म्हणजेच पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये पाच रिसर्चपेपर प्रसिद्ध झाले पाहिजेत. पण वेळूकर यांच्या रिसर्च पेपरच्या दर्जाबाबतच आता प्रश्न उभे राहिले आहे.कुलगुरु निवडीबाबतचा हा वाद फक्त राज्यपालांच्या तक्रारीपुरताच मर्यादित नाही. तर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा अरुण सावंत आणि नितीन देशपांडे यांनी याविरोधात हायकोर्टात जनहित याचिकेच्या माध्यमातून धाव घेत आहे."हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं अनैतिक ठरेल," असं वेळूकर म्हणतात.कुलगुरुपदाची कुठलीच निकष वेळूकरांनी पूर्ण केलेली नसताना, त्यांची त्या पदावर वर्णी कशी लागली, यावरुनच आता शिक्षणक्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2010 11:26 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह

अलका धुपकर, मुंबई

16 नोव्हेंबर

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांची कुलगुरुपदी निवड होऊन चार महिने झाले आहेत. तरीही त्यांच्या पात्रतेबाबतचा वाद अजूनही सुरुच आहे.

आता माहिती अधिकार कायद्याखाली काही प्राध्यापकांनी कुलगुरुंच्या निवडप्रक्रियेतील कागदपत्र मिळवली आहे. आणि कुलगुरुंपेक्षा संशोधनाचा अधिक अनुभव असलेल्या उमेदवारांना कसे डावलण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे.

डॉ. राजन वेळूकर यांनी कुलगुरु पदाच्या उमेदवारी अर्जामध्ये आपले 12 रिसर्चपेपर प्रसिद्ध झाले असल्याचा दावा केला.

नियमानुसार संशोधन आणि अकॅडमिक क्षेत्रात मान्यताप्राप्त असलेल्या म्हणजेच पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये पाच रिसर्चपेपर प्रसिद्ध झाले पाहिजेत. पण वेळूकर यांच्या रिसर्च पेपरच्या दर्जाबाबतच आता प्रश्न उभे राहिले आहे.

कुलगुरु निवडीबाबतचा हा वाद फक्त राज्यपालांच्या तक्रारीपुरताच मर्यादित नाही. तर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा अरुण सावंत आणि नितीन देशपांडे यांनी याविरोधात हायकोर्टात जनहित याचिकेच्या माध्यमातून धाव घेत आहे.

"हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं अनैतिक ठरेल," असं वेळूकर म्हणतात.

कुलगुरुपदाची कुठलीच निकष वेळूकरांनी पूर्ण केलेली नसताना, त्यांची त्या पदावर वर्णी कशी लागली, यावरुनच आता शिक्षणक्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2010 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...