धर्मदेवच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारची मदत

दिनांक 29 ऑक्टोबर, मुंबई - मुंबईच्या लोकलमध्ये मारहाणीत मृत्यू पावलेल्या उत्तर भारतीय तरुणाच्याकुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारनं दोन लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही दोन लाखांची मदत जाहीर केलीय. या प्रकरणी पोलिसांनी दहा लोकांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला केली आहे.मुंबईजवळच्या खोपोली रेल्वेस्टेशनजवळ लोकलमध्ये झालेल्या भांडणात काल एका उत्तर भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. धर्मदेव रामनारायण राय असं त्याचं नाव आहे. आठ ते दहा जणांनी केलेल्या मारहाणीत धर्मदेवचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्यासोबत प्रवास करणा-या विरेंद्र राय यांनी केलाय. खोपोलीतल्या झोपडपट्टीत राहणारे विरेंद्र कृपाशंकर राय, शिवकुमार कृपाशंकर राय, सत्यप्रकाश राय आणि धर्मदेव रामनारायण राय हे खोपोलीतून कुर्ल्याकडे निघाले होते. यावेळी लोकलमध्ये काही जणांशी धर्मदेवचा वाद झाला. या वादातून धर्मदेवला मारहाणही करण्यात आली. या मारहाणीत धर्मदेव रामनारायण राय अत्यवस्थ झाला. त्याला बाबा घनशामदास दुबे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर मारहाण करणारे पळून गेल्याचं विरेंद्र यांनी सांगितलं. राजकीय नेत्यांनी मात्र या प्रकरणाचा चांगलाच फायदा घ्यायचं ठरवलंय. या प्रकरणात मायावतींसोबत एकत्र येण्याची इच्छा समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी बोलून दाखवली.

  • Share this:

First published: October 29, 2008, 1:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या