दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न

22 ऑक्टोबर2009चे घोषित झालेले राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीत देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांचा गौरव केला गेला. पा मधल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपटात नटरंगलाही प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. कुट्टी श्रंक या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार देण्यात आला. तर 3 इडियट्स सिनेमाला करमणुकीसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमाने गौरव करण्यात आला. त्यासाठी स्वानंद किरकिरे यांनी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय दिल्ली सिक्स, वेल डन आब्बा, देव डी या सिनेमांनाही राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा संपन्न झाला.पुरस्कार वितरणसर्वोत्कृष्ट सिनेमा - कुट्टी श्रंकसर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन ( सिनेमा - पा)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अनन्या चॅटर्जी ( अबोहोमन )सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रितुपर्णो घोष ( अबोहोमन )करमणुकीसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा - 3 इडियट्सराष्ट्रीय एकात्मकतेसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा - दिल्ली 6सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट - वेल डन अब्बासर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा -नटरंगसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - फारुक शेख ( सिनेमा - लाहोर)सर्वोत्कष्ट संगीत - अमित त्रिवेदी ( सिनेमा-देव डी)सर्वोत्कृष्ट गीतकार - स्वानंद किरकिरे ( सिनेमा - 3 इडियट्स)

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2010 04:04 PM IST

दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न

22 ऑक्टोबर

2009चे घोषित झालेले राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीत देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांचा गौरव केला गेला. पा मधल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मराठी चित्रपटात नटरंगलाही प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. कुट्टी श्रंक या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार देण्यात आला.

तर 3 इडियट्स सिनेमाला करमणुकीसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमाने गौरव करण्यात आला.

त्यासाठी स्वानंद किरकिरे यांनी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय दिल्ली सिक्स, वेल डन आब्बा, देव डी या सिनेमांनाही राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा संपन्न झाला.

पुरस्कार वितरण

सर्वोत्कृष्ट सिनेमा - कुट्टी श्रंक

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन ( सिनेमा - पा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अनन्या चॅटर्जी ( अबोहोमन )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रितुपर्णो घोष ( अबोहोमन )

करमणुकीसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा - 3 इडियट्स

राष्ट्रीय एकात्मकतेसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा - दिल्ली 6

सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट - वेल डन अब्बा

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा -नटरंग

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - फारुक शेख ( सिनेमा - लाहोर)

सर्वोत्कष्ट संगीत - अमित त्रिवेदी ( सिनेमा-देव डी)

सर्वोत्कृष्ट गीतकार - स्वानंद किरकिरे ( सिनेमा - 3 इडियट्स)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...