माणिकरावांना संधी नाही

माणिकरावांना संधी नाही

22 ऑक्टोबरकॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांना बदलणयाचे कॉग्रेसने निश्चित केले आहे अशी माहिती समोर येते आहे.दिल्लीवरुन प्रदेशाध्यक्षपदासाठी पर्यायी नावांचा शोध सुरु झाला आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशअध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गोटातून खासदार अविनाश पांडे यांच नाव पुढे करण्यात आले आहे. तर विलासराव देशमुख यांच्या गोटातून जयवंतराव आवळे, उल्हासदादा पवार आणि शिवाजीराव मोघे यांची नाव पुढे करण्यात आली आहेत. पण त्याच बरोबर अनपेक्षितपणे शरद रणपिसे यांच ही नाव चर्चेत आले आहे. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृपा शंकर सिंह यांच्या जागीही नविन चेहर्‍याचा शोध सुरु आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत, चंद्रकांत हंडोरे, राजहंस सिंह, एकनाथ गायकवाड, भाई जगताप, मधू चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. 2 नोव्हेंबरच्या काग्रेस अधिवेशनानंतर, नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर होणार असले. तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षाचे नाव कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

22 ऑक्टोबर

कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांना बदलणयाचे कॉग्रेसने निश्चित केले आहे अशी माहिती समोर येते आहे.

दिल्लीवरुन प्रदेशाध्यक्षपदासाठी पर्यायी नावांचा शोध सुरु झाला आहे.

आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशअध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गोटातून खासदार अविनाश पांडे यांच नाव पुढे करण्यात आले आहे.

तर विलासराव देशमुख यांच्या गोटातून जयवंतराव आवळे, उल्हासदादा पवार आणि शिवाजीराव मोघे यांची नाव पुढे करण्यात आली आहेत.

पण त्याच बरोबर अनपेक्षितपणे शरद रणपिसे यांच ही नाव चर्चेत आले आहे. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृपा शंकर सिंह यांच्या जागीही नविन चेहर्‍याचा शोध सुरु आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत, चंद्रकांत हंडोरे, राजहंस सिंह, एकनाथ गायकवाड, भाई जगताप, मधू चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

2 नोव्हेंबरच्या काग्रेस अधिवेशनानंतर, नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर होणार असले.

तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षाचे नाव कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 10:01 AM IST

ताज्या बातम्या