नांदेडमध्ये शीख आणि मराठी बांधवाची दिवाळी एकत्र

28 ऑक्टोबर, नांदेड - दिवाळीचा उत्साह आता सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. नांदेडकरांसाठी तर यंदाची दिवाळी अविस्मरणीय ठरली आहे. गुरू-ता-गद्दी आणि दिवाळी असे दोन्ही एकाच वेळी आल्याने नांदेडकरांना अनेक पाहुण्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत आहे.नांदेडचे रहिवासी असलेले ओमप्रकाश व्यास यांच्या घरी एक पंजाबी कुटुंब राहायला आलं आहे. या कुटुंबांसमवेत आमची दिवाळी छान साजरी झाली आहे’, असं ओमप्रकाश व्यास सांगत होते. या सोहळ्यासाठी दूरवरून आलेले पाहुणेही नांदेडमध्ये अनेक घरांमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळं नांदेडकरांसाठी यंदाची दिवाळी खास ठरली आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या अतिथी महिला पंजाबी मनसिंग अमृतसरकर नांदेडचं उत्साहपूर्ण वातावरण पाहुन म्हणाल्या, ‘सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदानं राहणं, हा संदेश प्रत्येक उत्सवातून दिला जातो. नांदेडमध्ये गुरू ज्ञ्ता- गद्दी सोहळा आणि दिवाळीच्या उत्साहाचं हा अनोखा संगम दिसून येत आहे. ते कसं ते शेजा-याच्या व्हिडिओवर -

  • Share this:

First published: October 28, 2008, 1:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या