नागपुरात जगामधील सर्वात उंच समई

नागपुरात जगामधील सर्वात उंच समई

28 ऑक्टोबर, नागपूर - दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. पणत्या आणि समईच्या उजेडात घरोघरी वातावरण मंगलमय होऊन जातं पण नागपूरच्या बनाईत कुटुंबाची दिवाळी ख-या अर्थानं भव्य असते. कारण त्यांच्या घराच्या अंगणात जगातील सर्वात उंच समई आहे.डॉ.अविनाश आणि जयश्री बनाईत यांनी तयार केलेली फायबरची समई जगातली सगळ्यात उंच समई ठरली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे. 60 फूट उंचीची ही समई दिवाळीचं एक मोठं आकर्षण ठरली आहे. जगातील सर्वात उंच समईचे निर्माते डॉ. अविनाश बनकर सांगतात, 'ही समई फायबरची असल्याचं चटकन लक्षातही येत नाही. तिच्यावरचं कोरीव कामही अगदी डोळ्यात भरण्यासारखं आहे. दिवाळीच्या दिवसांत या समईचा उजेड आसपासच्या भागालाही उजळून टाकतो'.या समईसह दिवाळी साजरी करताना या बनाईत परिवारानं फटाक्यांचे पैसे बिहारमधील पुरग्रस्तांना द्यायचं ठरवलंय. विशेष म्हणजे बच्चे कंपनीनं त्यासाठी पुढाकार घेतला आहे.अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची वाट दाखवणारी ही समई, समृद्धीचा अनोखा संदेश देत दिमाखात उभी आहे. देशातल्या अस्थिर वातावरणातून सर्वांना निर्भय करण्याची प्रार्थना या समईकडे करण्यात येत आहे.

  • Share this:

First published: October 28, 2008, 11:35 AM IST
Tags:

ताज्या बातम्या