मोबीन कुरेशीची होत आहे पाठराखण

मोबीन कुरेशीची होत आहे पाठराखण

29 सप्टेंबरगृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दाऊदशी संबंध असलेल्या काही लोकांची भेट घेतल्याची बातमी 'आयबीएन लोकमत'ने काल दाखवली होती. भेट घेणार्‍यांमध्ये अल्पसंख्याक आयोगाचा सदस्य मोबीन कुरेशी हाही होता. भाजप आमदार प्रेमकुमार शर्मा यांच्या खूनप्रकरणातही मोबीन कुरेशीचे नाव आले होते. तसेच सागर हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड करुन तेथील कर्मचार्‍यांना धमकावल्याचा गुन्हा मोबीनवर दाखल आहे. याप्रकरणी त्याच्या 17 साथीदारासह 30 ते 35 लोकांचा जमाव घेऊन सागर हॉटेलमध्ये घुसले होते. सागर हॉटेल मोबीने दीड कोटी रुपयाला खरेदी केल्याचा दावा करुन हे हॉटेल ताब्यात घेण्यासाठी तिथे गेला होता. याचवेळी या हॉटेलच्या मालकांशी त्याची वादावादी होऊन, त्यांना मोबीने मारहाण केली होती. हा सर्व प्रकार पोलिसांच्यासमोर सुरु होता, ही बाब अजूनही गंभीर आहे. आणि हाच मोबीन कुरेशी हा राज्य अल्पसंख्याक आयोगाचा सदस्यही आहे. नसिम सिद्दीकी हे याच मोबीन कुरेशीची पाठराखण करत आहेत. एक नजर टाकूयात मोबीन कुरेशीवर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांवर...कलम 143 नुसार बेकायदा जमाव जमा करेल किंवा त्याचा सदस्य असेल अशा गुन्ह्यासाठी सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंड , शिक्षा आणि दंड दोन्हीही एकावेळी होऊ शकतो. कलम 145 नुसार जमावबंदीचा आदेश असताना जमाव करेल आणि असा जमाव करणे हा गुन्हा आहे, हे माहित असताना जमाव केल्यास त्यास दोन महिन्यांची शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंड एकाचवेळी अशी तरतूद या कलमात आहे.कलम 147 नुसार दंगल भडकवण्यासाठी जो कोणी जबाबदार आहे, त्याला दोन वर्षे शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.कलम 149 नुसार जमावबंदीचा आदेश असताना जमाव जमवून त्या जमावात असलेल्या व्यक्तीला माहित असो वा नसो, जर तो अशा जमावाचा भाग असेल तर त्यासाठी त्याला गुन्हेगार समजण्यात येईल. त्यासाठीही शिक्षा होऊ शकते.कलम 349 नुसार चुकीच्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला विरोध करत असेल तर त्यासाठी साधी 1 महिन्यापर्यंतच्या शिक्षा, तसेच 500 रुपये दंडाची तरतूद आहे. शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतो.कलम 452 नुसार जो कोणी एखाद्याच्या घरात घुसून कुणावर हल्ला करण्याच्या तयारीत असणे किंवा एखाद्याला धक्काबुक्की करणे किंवा अवैधरित्या एखाद्याला विरोध करणे, या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.कलम 323 नुसार अचानक हल्ला करणे आणि त्यात जखमी करणं यासाठी एक वर्षे शिक्षेची तरतूद आणि दंड, शिक्षा आणि दंड दोन्ही एकाच वेळी होऊ शकतो. कलम 504 नुसार एखाद्याने हेतुपुरस्सररित्या एखाद्याचा अपमान करणे, एखाद्या व्यक्तीला हेतुपुरस्सर भडकावणे यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. हे माहिती असून असे कृत्य केल्याप्रकरणी दोन वर्षे शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकते.कलम 506 नुसार जो कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीतून एखाद्याला भडकावण्याबद्दल दोन वर्षे शिक्षा किंवा दंड , शिक्षा किंवा दंड दोन्हीची तरतूद आहे. जर एखाद्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि अशा कृत्यातून एखाद्याला इजा झाली किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यासाठी जन्मठेप किंवा सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे.

  • Share this:

29 सप्टेंबर

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दाऊदशी संबंध असलेल्या काही लोकांची भेट घेतल्याची बातमी 'आयबीएन लोकमत'ने काल दाखवली होती. भेट घेणार्‍यांमध्ये अल्पसंख्याक आयोगाचा सदस्य मोबीन कुरेशी हाही होता.

भाजप आमदार प्रेमकुमार शर्मा यांच्या खूनप्रकरणातही मोबीन कुरेशीचे नाव आले होते. तसेच सागर हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड करुन तेथील कर्मचार्‍यांना धमकावल्याचा गुन्हा मोबीनवर दाखल आहे. याप्रकरणी त्याच्या 17 साथीदारासह 30 ते 35 लोकांचा जमाव घेऊन सागर हॉटेलमध्ये घुसले होते.

सागर हॉटेल मोबीने दीड कोटी रुपयाला खरेदी केल्याचा दावा करुन हे हॉटेल ताब्यात घेण्यासाठी तिथे गेला होता. याचवेळी या हॉटेलच्या मालकांशी त्याची वादावादी होऊन, त्यांना मोबीने मारहाण केली होती. हा सर्व प्रकार पोलिसांच्यासमोर सुरु होता, ही बाब अजूनही गंभीर आहे. आणि हाच मोबीन कुरेशी हा राज्य अल्पसंख्याक आयोगाचा सदस्यही आहे. नसिम सिद्दीकी हे याच मोबीन कुरेशीची पाठराखण करत आहेत.

एक नजर टाकूयात मोबीन कुरेशीवर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांवर...

कलम 143 नुसार बेकायदा जमाव जमा करेल किंवा त्याचा सदस्य असेल अशा गुन्ह्यासाठी सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंड , शिक्षा आणि दंड दोन्हीही एकावेळी होऊ शकतो.

कलम 145 नुसार जमावबंदीचा आदेश असताना जमाव करेल आणि असा जमाव करणे हा गुन्हा आहे, हे माहित असताना जमाव केल्यास त्यास दोन महिन्यांची शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंड एकाचवेळी अशी तरतूद या कलमात आहे.

कलम 147 नुसार दंगल भडकवण्यासाठी जो कोणी जबाबदार आहे, त्याला दोन वर्षे शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.

कलम 149 नुसार जमावबंदीचा आदेश असताना जमाव जमवून त्या जमावात असलेल्या व्यक्तीला माहित असो वा नसो, जर तो अशा जमावाचा भाग असेल तर त्यासाठी त्याला गुन्हेगार समजण्यात येईल. त्यासाठीही शिक्षा होऊ शकते.

कलम 349 नुसार चुकीच्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला विरोध करत असेल तर त्यासाठी साधी 1 महिन्यापर्यंतच्या शिक्षा, तसेच 500 रुपये दंडाची तरतूद आहे. शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतो.

कलम 452 नुसार जो कोणी एखाद्याच्या घरात घुसून कुणावर हल्ला करण्याच्या तयारीत असणे किंवा एखाद्याला धक्काबुक्की करणे किंवा अवैधरित्या एखाद्याला विरोध करणे, या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

कलम 323 नुसार अचानक हल्ला करणे आणि त्यात जखमी करणं यासाठी एक वर्षे शिक्षेची तरतूद आणि दंड, शिक्षा आणि दंड दोन्ही एकाच वेळी होऊ शकतो.

कलम 504 नुसार एखाद्याने हेतुपुरस्सररित्या एखाद्याचा अपमान करणे, एखाद्या व्यक्तीला हेतुपुरस्सर भडकावणे यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. हे माहिती असून असे कृत्य केल्याप्रकरणी दोन वर्षे शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकते.

कलम 506 नुसार जो कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीतून एखाद्याला भडकावण्याबद्दल दोन वर्षे शिक्षा किंवा दंड , शिक्षा किंवा दंड दोन्हीची तरतूद आहे. जर एखाद्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि अशा कृत्यातून एखाद्याला इजा झाली किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यासाठी जन्मठेप किंवा सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 02:58 PM IST

ताज्या बातम्या