ना जेलचं जेवण, ना कैद्याचे कपडे ; सलमानची रात्र तुरूंगातच !

ना जेलचं जेवण, ना कैद्याचे कपडे ; सलमानची रात्र तुरूंगातच !

कैदी नंबर 106 हा क्रमांक सलमानला देण्यात आला होता. त्याला बराक क्रमांक 2मध्ये ठेवण्यात आलंय.

  • Share this:

राजस्थान, 06 एप्रिल : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला कालची रात्र जेलमध्येच काढावी लागली. सलमाननं तुरुंगातील जेवणं आणि कैद्यांचे कपडेही नाकारले. एवढेच नाहीतर सलमानने फरशीवरच झोपणे पसंद केले.

20 वर्षांपूर्वी 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली होती. तब्बल 20 वर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर सलमान खान दोषी आढळला. त्याला जोधपूर सत्र न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड ठोठावला. त्याच्यासह इतर कलाकार सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे यांना निर्दोष ठरवण्यात आलं.

शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच त्याला सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं. तिथे त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली, ज्यामध्ये तो फिट असल्याचं सांगण्यात आलं. कैदी नंबर 106 हा क्रमांक सलमानला देण्यात आला होता. त्याला बराक क्रमांक 2मध्ये ठेवण्यात आलंय. तिथे त्याचा शेजारी  आसाराम बापू आहे. जेलमध्ये गेल्यानंतर सलमानने पहिले शौचालयाची अवस्था काय आहे याची चौकशी केली. त्याने तुरुंगातलं जेवणं घेण्यास नकार दिला. अशी माहिती मिळतेय की, सलमान जेलमध्ये गेल्यानंतर त्याला त्याच्या मॅनेजरनं हॉटेल ताजमधून जेवण आणि काही कपडे आणून दिल्याची माहिती पुढं आलीय. मात्र जेल प्रशासनानं त्याचा इन्कार केलाय.

First published: April 6, 2018, 7:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading