शरद पवारांच्या बेळगावमधील सभेला अखेर पोलिसांची परवानगी

शरद पवारांच्या बेळगावमधील सभेला अखेर पोलिसांची परवानगी

या सभेला प्राध्यापक एनडी पाटील हे देखील उद्याच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.

  • Share this:

बेळगाव, 30 मार्च :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बेळगावातील सभेला अखेर कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिली आहे. आचारसंहितेतील नियमांचं पालन व्हावं या अटीवर परवानगी देण्यात आलीये.

सीपीएड मैदानावर शनिवारी शरद पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सभेचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवार यांच्या या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

मात्र अखेर आचारसंहितेतील नियमांचं पालन व्हावं या अटीवर परवानगी पोलिसांनी शरद पवारांच्या सभेला परवानगी दिलीये अशी माहिती एम. ए समितीच्या माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.

या सभेला प्राध्यापक एनडी पाटील हे देखील उद्याच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.

First published: March 30, 2018, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading