श्रीदेवी मृत्यू प्रकरणामागे दाऊदचा हात, स्वामींचं खळबळजनक वक्तव्य

श्रीदेवी मृत्यू प्रकरणामागे दाऊदचा हात, स्वामींचं खळबळजनक वक्तव्य

दाऊद इब्राहिम आणि सिने अभिनेत्री यांचे अनैतिक संबंध लक्षात घेता त्याकडे लक्ष द्यावं लागेल असं विधानही सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

  • Share this:

27 फेब्रुवारी : आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यम  स्वामी  यांनी श्रीदेवी यांच्या निधनावरूनही वादग्रस्त वक्तव्य केलंय. स्वामींनी श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय.

श्रीदेवी यांच्या मृत्यूचं कारण डाॅक्टरांनी कार्डिएक अॅटक असल्याचं सांगताय तर दुसरीकडे पोस्टमाॅर्टेम रिपोर्टमध्ये वेगळंच कारण पुढे आलंय. त्यांनी कधी अति मद्यप्राशन केलं नाही मग त्यांच्या शरीरात दारूचा अंश कसा सापडला. श्रीदेवी यांना धक्का दिल्याशिवाय त्या बाथटबमध्ये पडल्याच कशा, असा सवाल उपस्थित करत त्यांनी श्रीदेवी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केलाय.

स्वामी एवढ्यावरच थांबले नाही. दाऊद इब्राहिम आणि सिने अभिनेत्री यांचे अनैतिक संबंध लक्षात घेता त्याकडे लक्ष द्यावं लागेल असं विधानही सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

संबंधीत बातम्या

श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द,भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

'चांदनी'च्या एक्झिटमुळे बाॅलिवूडमध्ये होळीचे रंग फिके, शबाना आझमींनी केलं ट्विट

'यामुळे' बोनी कपूर आणि श्रीदेवीमध्ये व्हायची भांडणं!

श्रीदेवीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात सापडला दारूचा अंश

हा पहा श्रीदेवी यांचा दुबईतल्या लग्न समारंभातला शेवटचा व्हिडिओ

हे पहा श्रीदेवी यांचे गाजलेले सिनेमे

श्रीदेवी आणि टॉलिवूड

First published: February 27, 2018, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading