नटरंगला राष्ट्रीय सन्मान

नटरंगला राष्ट्रीय सन्मान

15 सप्टेंबरढोलकी, घुंगराच्या ठेक्यावर मराठी मनांना ताल धरायला लावणार्‍या नटरंग सिनेमाने आता देशातील सिनेरसिकांनाही भुरळ घातली आहे. उत्कृष्ठ मराठी सिनेमा म्हणून नटरंग सिनेमाला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. 57 व्या राष्ट्रीय फिल्म अवॉर्डस्‌ची आज दिल्लीत घोषणा झाली. त्यात नटरंगच्या राष्ट्रीय सन्मानाची घोषणा करण्यात आली. अमिताभ बच्चन यांना 'पा'मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार लाभला आहे.थ्री इडियटस् 2009 सालची सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फिल्म ठरली आहे.स्वानंद किरकिरे यांना थ्री इडियटस्‌मधील 'बहेती हवा सा था वो ' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार लाभला आहे.दिल्ली सिक्सला नरगिस दत्त यांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार लाभला आहे.सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमचा पुरस्कार देव डीच्या अमित त्रिवेदी यांना मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार रितुपर्णो घोष यांना ओबोहोमान या सिनेमासाठी मिळाला आहे. 'कुट्टी स्रंकू'ला सुवर्णकमळ मामूट्टीची प्रमुख भूमिका असलेल्या 'कुट्टी स्रंकू' या सिनेमाला सुवर्णकमळ बहुमान मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट कॉश्च्युम असे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. पण याशिवाय बॉलीवूडनेही या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये चांगलीच बाजी मारली, असे म्हणावे लागेल.बॉलीवूडला मिळालेले इतर पुरस्कार 'पा'चा सन्मानपा या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यात महत्त्वाचा म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जो बिग बी अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. याशिवाय अरुंधती नाग यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अमिताभचे रुप पालटून त्याला 14 वर्षांचा ऑरो ज्यांनी बनवला ते मेकअप आर्टिस्ट क्रिस्टीयन टिन्सले आणि डॉमिनी टिल यांचाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होणार आहे.थ्री इडियट्सला पसंतीसर्वोत्कृष्ट लोकप्रिय अर्थात पॉप्युलर सिनेमाचा मान थ्री इडियट्सने पटकावला. याचबरोबर या सिनेमातील 'बहती हवा सा था वो' या गीतासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला.सामाजिक आशयावरील सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीचा पुरस्कार मिळाला श्याम बेनेगल यांच्या वेल डन अब्बा या सिनेमाला.राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिल्ली 6 या सिनेमाला नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आधुनिक देवदासची कहाणी सांगणारा देव डी या सिनेमासाठी अमित त्रिवेदी यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.संजय पूरनसिंग चौहान यांचा वेगळ्या धाटणीचा 'लाहोर' हा सिनेमा, त्याचीही ज्युरींनी दखल घेतली. फारुख शेख यांना या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर पदार्पणातील दिग्दर्शनासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कारही याच सिनेमाने पटकावला आहे.

  • Share this:

15 सप्टेंबर

ढोलकी, घुंगराच्या ठेक्यावर मराठी मनांना ताल धरायला लावणार्‍या नटरंग सिनेमाने आता देशातील सिनेरसिकांनाही भुरळ घातली आहे.

उत्कृष्ठ मराठी सिनेमा म्हणून नटरंग सिनेमाला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

57 व्या राष्ट्रीय फिल्म अवॉर्डस्‌ची आज दिल्लीत घोषणा झाली. त्यात नटरंगच्या राष्ट्रीय सन्मानाची घोषणा करण्यात आली.

अमिताभ बच्चन यांना 'पा'मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार लाभला आहे.

थ्री इडियटस् 2009 सालची सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फिल्म ठरली आहे.

स्वानंद किरकिरे यांना थ्री इडियटस्‌मधील 'बहेती हवा सा था वो ' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार लाभला आहे.

दिल्ली सिक्सला नरगिस दत्त यांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार लाभला आहे.

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमचा पुरस्कार देव डीच्या अमित त्रिवेदी यांना मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार रितुपर्णो घोष यांना ओबोहोमान या सिनेमासाठी मिळाला आहे.

'कुट्टी स्रंकू'ला सुवर्णकमळ

मामूट्टीची प्रमुख भूमिका असलेल्या 'कुट्टी स्रंकू' या सिनेमाला सुवर्णकमळ बहुमान मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट कॉश्च्युम असे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. पण याशिवाय बॉलीवूडनेही या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये चांगलीच बाजी मारली, असे म्हणावे लागेल.

बॉलीवूडला मिळालेले इतर पुरस्कार

'पा'चा सन्मान

पा या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यात महत्त्वाचा म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जो बिग बी अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. याशिवाय अरुंधती नाग यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अमिताभचे रुप पालटून त्याला 14 वर्षांचा ऑरो ज्यांनी बनवला ते मेकअप आर्टिस्ट क्रिस्टीयन टिन्सले आणि डॉमिनी टिल यांचाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होणार आहे.

थ्री इडियट्सला पसंती

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अर्थात पॉप्युलर सिनेमाचा मान थ्री इडियट्सने पटकावला. याचबरोबर या सिनेमातील 'बहती हवा सा था वो' या गीतासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला.

सामाजिक आशयावरील सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीचा पुरस्कार मिळाला श्याम बेनेगल यांच्या वेल डन अब्बा या सिनेमाला.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिल्ली 6 या सिनेमाला नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आधुनिक देवदासची कहाणी सांगणारा देव डी या सिनेमासाठी अमित त्रिवेदी यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

संजय पूरनसिंग चौहान यांचा वेगळ्या धाटणीचा 'लाहोर' हा सिनेमा, त्याचीही ज्युरींनी दखल घेतली. फारुख शेख यांना या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर पदार्पणातील दिग्दर्शनासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कारही याच सिनेमाने पटकावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 11:20 AM IST

ताज्या बातम्या