राज ठाकरेंवरील खटल्यांभोवती फिरतंय राजकारण

26 ऑक्टोबर, मुंबईउत्तर प्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणात राज ठाकरे यांच्यावर खटले भरण्यात आले. पण ज्या जागा निवडल्या गेल्या, त्यामागेही राजकारण असल्याची चर्चा आता रंगली आहे. मराठी मतं अधिक असलेल्या भागात राज यांच्यावर खटले चालवले जात असल्याचं आता स्पष्ट झालंय. राज ठाकरेंना महत्त्व वाढवण्याची संधी देण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे यांना वांद्रे कोर्ट आणि कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. वास्तविक राज यांच्यावर बोरिवलीत दोन गुन्हे दाखल होते. कांजूरमार्ग इथं गुन्हा दाखल होता. खेरवाडी इथंही होता. पण अटक फक्त खेरवाडी इथल्या गुन्ह्यात झाली. यामागं राजकारण असल्याचं बोललं जातंय. बोरिवलीत भाजपचा प्रभाव तर कांजूरमार्गचा भाग काँग्रेस-एनसीपीच्या ताब्यात. मात्र राजना अटक बाळासाहेब ठाकरेंच्या बंगल्यापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या खेरवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात झाली. हाच प्रकार कल्याणच्या बाबतीतही झाला. ' आम्ही आनंद परांजपेंचीनिवडणूक जिंकली. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, कल्याण- डोंबिवली महापालिकांवर भगवा आहे, असं असताना याच भागात हे खटले चालवण्यामागे आघाडी सरकारच राजकारण आहे. मराठी मतांची फाटाफूट करण्याचं हे राजकारण शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही ' , असं ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आयबीएन लोकमत शी बोलताना सांगितलं.__PAGEBREAK__कल्याण कोर्टात पहिल्याच दिवशी राजना हजर न केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये जबरदस्त तोडफोड, जाळपोळ केली. कल्याण महापालिकेच्या पोटनिवडणुकीत फक्त 459 मतं मिळवणार्‍या मनसेचा दरारा या घटनेनं नक्कीच वाढला आहे. राजकारणासाठी ठाणे जिल्हा महत्त्वाचा आहे. 24 आमदार आणि 4 खासदार इथून निवडले जाणार आहेत. ठाणे शहर आणि नवी मुंबई या भागातून एक, कल्याण डोंबिवली अंबरनाथ इथून एक तर उरलेल्याग्रामीण भागातून दोन असे 4 खासदार असणार आहेत. यात कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांमधून एकूण 12 आमदार निवडले जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणं, हे शिवसेनेसाठी मोठं काम आहे. मनसेच्या कोर्टबाजीचा धुरळा बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांना यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2008 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...