• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'याद रखो मोदीजी', पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर रावण आक्रमक
  • VIDEO: 'याद रखो मोदीजी', पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर रावण आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 02:27 PM IST | Updated On: Dec 29, 2018 02:27 PM IST

    मुंबई, 29 डिसेंबर : मुंबईत सभा घेण्यासाठी आलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. त्यानंतर रावण यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना मालाडच्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद यांना पुणे-मुंबईत सभा घ्यायला पोलिसांनी मनाई केली आहे. आझाद यांनी विमानानं घरी जावं, अशी सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आझाद यांना विमानात बसवून देतील, असं स्पष्ट करण्यात आलं. पोलिसांच्या या भूमिकेवर आझाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी