श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मागितली माफी

17 ऑगस्टभारताने श्रीलंकेविरूध्द सामना जिंकला खरा पण सेहवागची सेंच्युरी 1 रन्सने मात्र हुकली. सेहवागची सेंच्युरी होऊ नये यासाठी जाणूनबूजून नो बॉल टाकणार्‍या सुरज रणदीवनं सेहवागची माफी मागितली. सेहवागने ही गोष्ट ट्विटरवर स्पष्ट केली. काल रणदिव माझ्या रुममध्ये आला आणि त्याने माफी मागितली असं सेहवागने म्हटलं आहे.तर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने ही माफी मागितली आहे.भारताच्या विजयासाठी आणि सेहवागच्या सेंच्युरीसाठी एक रनची गरज होती. श्रीलंकेचा स्पीनर सुरज रणदीवची ओव्हर होती. याचं ओव्हरमध्ये सेहवागनं शानदार सिक्सही मारला. पण दुर्देवानं तो नो बॉल ठरला. नियमानुसार ओव्हरस्टेप नो बॉलवर केलेले रन्स मोजले जात नाहीत. फक्त सेहवागची सेंच्युरी होऊ नये यासाठीच रणदीवनं जाणूनबूजून नो बॉल टाकला होता.त्यामुळे सेहवागची सेंच्युरी हुकली आणि तो 99 रन्सवर नॉटआऊट राहिला. या सगळ्या प्रकारानंतर श्रीलंकेच्या खिलाडूवृत्तीवर टीका करण्यात आली. श्रीलंका बोर्डानेही या घडलेल्या प्रकारानंतर माफी मागितली. तसेच या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. श्रीलंका टीम मॅनेजर या प्रकाराची चौकशी करणार आहे आणि त्याचा अहवाल श्रीलंका बोर्डाला सादर करणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2010 06:09 PM IST

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मागितली माफी

17 ऑगस्ट

भारताने श्रीलंकेविरूध्द सामना जिंकला खरा पण सेहवागची सेंच्युरी 1 रन्सने मात्र हुकली. सेहवागची सेंच्युरी होऊ नये यासाठी जाणूनबूजून नो बॉल टाकणार्‍या सुरज रणदीवनं सेहवागची माफी मागितली. सेहवागने ही गोष्ट ट्विटरवर स्पष्ट केली. काल रणदिव माझ्या रुममध्ये आला आणि त्याने माफी मागितली असं सेहवागने म्हटलं आहे.तर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने ही माफी मागितली आहे.

भारताच्या विजयासाठी आणि सेहवागच्या सेंच्युरीसाठी एक रनची गरज होती. श्रीलंकेचा स्पीनर सुरज रणदीवची ओव्हर होती. याचं ओव्हरमध्ये सेहवागनं शानदार सिक्सही मारला. पण दुर्देवानं तो नो बॉल ठरला. नियमानुसार ओव्हरस्टेप नो बॉलवर केलेले रन्स मोजले जात नाहीत. फक्त सेहवागची सेंच्युरी होऊ नये यासाठीच रणदीवनं जाणूनबूजून नो बॉल टाकला होता.

त्यामुळे सेहवागची सेंच्युरी हुकली आणि तो 99 रन्सवर नॉटआऊट राहिला. या सगळ्या प्रकारानंतर श्रीलंकेच्या खिलाडूवृत्तीवर टीका करण्यात आली. श्रीलंका बोर्डानेही या घडलेल्या प्रकारानंतर माफी मागितली. तसेच या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. श्रीलंका टीम मॅनेजर या प्रकाराची चौकशी करणार आहे आणि त्याचा अहवाल श्रीलंका बोर्डाला सादर करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...