'निवृत्त अधिकार्‍यांनो सरकारी घरं महिनाभरात सोडा'

'निवृत्त अधिकार्‍यांनो सरकारी घरं महिनाभरात सोडा'

  • Share this:

Image img_235582_supriamcoartonbhullar_240x180.jpg05 जुलै : सरकारी अधिकारी, मंत्री आणि न्यायाधीशांनी बेकायदेशीर पद्धतीने बळकावलेल्या बंगल्यांवर सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढले आहे. निवृत्त झाल्यानंतर महिन्याभरात सरकारी बंगले खाली करावे असे आदेश कोर्टाने दिले आहे. सरकारी निवासस्थानांची स्मारकं केली जाऊ शकत नाहीत अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने नोंद केलीय.

 

बेकायदेशीर पद्धतीनं बळकावलेल्या बंगल्यांविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेच्या सुनावणीवर कोर्टाने हा निर्णय दिला. जर अधिकारी, मंत्री किंवा न्यायाधीश बंगला सोडण्यास तयार नसतील तर त्यांचं पेन्शन रोखून ठेवलं जाऊ शकतं असं सुप्रीम कोर्टाने निकालात नमूद केलंय. तसंच कोर्टाने लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार आणि त्यांचे वडील कैलासवासी बाबू जगजीवन राम यांच्या बंगल्यावरुन सुरु असलेल्या वादावरही टिप्पणी केली.

First published: July 5, 2013, 2:28 PM IST

ताज्या बातम्या