उत्तर प्रदेशमध्ये रक्षकच बनले भक्षक

उत्तर प्रदेशमध्ये रक्षकच बनले भक्षक

  • Share this:

rape sds

12  जून : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये सतत महिलांवरचे अत्याचार आणि खूनाच्या घटना उघडकीस येत आहेत. हमीरपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये खुद्द पोलिसांनीच बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. ही महिला आपल्या पतीच्या सुटकेसाठी गेली असता पोलीस स्टेशनमधून सगळे बाहेर गेल्यावर तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असून पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे पण बाकीचे तीन हवालदार फरार आहेत.

तर काल उत्तर प्रदेशमधल्या बहारिचमध्ये एका महिलेचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

या आधी उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात नुकतच दोन मुलींवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तोच ही घटना समोर आली आहे. बदायू प्रकरणानंतर अखिलेश यादव सरकारविरोधात संतापाचं वातावरण आहे.

First published: June 12, 2014, 12:43 PM IST

ताज्या बातम्या