भरसभेत प्रियांका गांधींकडे धावत आला तरूण, पाहा हा VIDEO

भरसभेत प्रियांका गांधींकडे धावत आला तरूण, पाहा हा VIDEO

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये पक्ष स्थापनादिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रियांका गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • Share this:

लखनऊ, 28 डिसेंबर : काँग्रेसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात अचानक एक गोंधळाचा प्रसंग उद्भवला होता.  काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या व्यासपीठावर बसलेल्या होत्या. तेव्हा एक तरूण थेट त्याच्याकडे धावत आला. त्यामुळे सुरक्षारक्षकांची एकच धावपळ उडाली होती.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये पक्ष स्थापनादिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रियांका गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रियांका गांधी या व्यासपीठावर इतर नेत्यांसह बसलेल्या होत्या. तेव्हा अचानक एक तरूण सुरक्षारक्षकांना भेदून थेट त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. अचानक धावत आलेल्या या तरुणामुळे प्रियांका गांधींही अचानक घाबरून गेल्या होत्या. तोपर्यंत सुरक्षारक्षकांनीही या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पण, या तरुणाने आपली व्यथा मांडण्यासाठी आलो असल्याचं सांगितल्यावर प्रियांकांनी या तरूणाला सोडून देण्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने प्रियांका यांच्याशी संवाद साधला आणि हस्तांदोलन सुद्धा केलं.

हा तरूण काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं. गुरमीत सिंग गांधी असं या तरुणाचं नाव आहे. त्याने प्रियांका यांना भेट देण्यासाठी एक फोटो आणला होता. पण, बऱ्याच वेळेपासून त्यांची भेट होत नव्हती. पण जेव्हा त्या व्यासपीठावर पोहोचल्या होत्या, तेव्हा त्यांनी थेट व्यासपीठावर धाव घेऊन भेट घेतली.

याआधीही घडले असे प्रकार

याआधीही दिल्लीत प्रियांका गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याचं समोर आलं होतं.  लोधी स्टेट इथं प्रियांका यांच्या निवास्थानी 5 तरूण घरात घुसले होते. या प्रकरणानंतर प्रियांका गांधी यांच्या कार्यालयाने सीआरपीएफच्या हलगर्जीपणामुळे घडला असा आरोप करण्यात आला. त्यानंतर सीआरपीएफ डीजीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  25 नोव्हेंबर रोजी एका स्कॉर्पिओ गाडीत तीन महिला आणि दोन तरूण बळजबरीने प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानात घुसले होते. सेल्फी काढण्यासाठी हे पाचही जण घरात घुसले होते.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात  मोदी सरकारने गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा परत घेतली होती. त्यानंतर झेड- प्लस सुरक्षा प्रदान केली होती. त्यामुळे गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सीआरपीएफवर आहे.

Published by: sachin Salve
First published: December 28, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading