तंटामुक्त गावात 5 कुटुंबांना वाळीत टाकले

तंटामुक्त गावात 5 कुटुंबांना वाळीत टाकले

दिनेश केळुसकर, रत्नागिरी 05 एप्रिलखेड तालुक्यातल्या कशेडी गावात 5 कुटुंबांना वाळीत टाकण्यात आलं आहे. या कुटुंबांशी कोणी संपर्क ठेवला तर त्यांनाही पाचशे ते एक हजार रुपये दंड भरावे लागतात. मुख्य म्हणजे वाळीत टाकण्याचा प्रकार हा जाती-पातीतून नाही तर किरकोळ वादातून घडला आहे. सरपंचांची या सगळ्या प्रकाराला साथ आहेच पण पोलिसही दुर्लक्ष करतायत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वाळीत टाकण्याचा प्रकार सुरु आहे तंटामुक्त पुरस्कार मिळालेल्या गावातच.निर्मल ग्राम आणि तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळालेलं रत्नागिरी जिल्ह्यातलं हे कशेडी गाव. पुरस्कार मिळाला म्हणजे गावात सगळं आलबेल आहे असं अजिबात नाही. उलट याच गावातल्या बबन म्हादगे यांच्या कुटुंबाला एका किरकोळ वादातून आठ वर्षांपूर्वी वाळीत टाकण्यात आलंय. बबन म्हादगे म्हणतात, मैतीला जाऊ देत नाहीत , मंदिरात जाऊ देत नाहीत, आमच्या आमंत्रण पत्रिका बंद केल्यात ते आम्हाला सांगतात की, 'तुम्ही या कशेडी गावात रहायचच नाही.'वाळीत टाकलेल्या म्हादगेंच्या कुटुंबाबरोबर संपर्क ठेवला म्हणून साळवींना दहा हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आलं. त्यांनी नकार दिला म्हणून मग त्यांनाही वाळीत टाकण्यात आलं.बाबा साळवी म्हणतात, बहिष्कार माझ्यावर टाकला की मी मादगेंशी बोलतो म्हणून. 3 टायम मी बैठक लावली. त्तर त्यांनी सांगितलं की, 10 हजार रुपये तू भर आणि गावाला भेट हे कुणी सांगितलं. तर सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष आणि त्यांचा भाऊ नथू गावनकर यांनी. आत्तापर्यंत या गावातल्या पाच कुटुंबांना वाळीत टाकण्यात आलंय आणि याशिवाय अनेक गरीब कुटुंबांकडून 500 ते 1000 रुपये दंडाच्या रुपात वसूल करण्यात आले आहेत.श्रीपत साळवी म्हणतात, ते आमच्यापासून चुकी झाली म्हनून आमी गावाला मिलून दंड भरला. हजार रुपये.हे सगळं सुरू आहे खुद्द सरपंच आणि गावच्या तंटामुक्त समितिच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार.तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोविंद गावनकर म्हणतात, पोलीस स्टेशनची गाडी हिथपर्यंत आली म्हणजे गाडीमध्ये टाकण्यासाठी कायतरी पायजे की नको..? झाला तसा प्रकार होतो. गावचा नियमच आमचा असा आहे. तुम्ही जर गुन्हा कबूल केलात तर देवाला तुम्ही कायतरी. म्हणजे लायटा वैगेरे जलनार. तुमी काय मानसाला मजूरी देताव,,? म्हनजे तुमी देवाच्या फुड्यात काय ठेवायचं ते ठेवा.वाळीत टाकल्याच्या विरोधात या कुटुंबांनी अनेकवेळा खेड पोलिसात धाव घेतली, पण पोलीसांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. असंच चित्र आहे आणि त्याचवेळेस व्यवस्थेचा धाक दाखवून या कुटुंबांचं आर्थिक आणि मानसिक शोषण सुरूच आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

05 एप्रिल

खेड तालुक्यातल्या कशेडी गावात 5 कुटुंबांना वाळीत टाकण्यात आलं आहे. या कुटुंबांशी कोणी संपर्क ठेवला तर त्यांनाही पाचशे ते एक हजार रुपये दंड भरावे लागतात. मुख्य म्हणजे वाळीत टाकण्याचा प्रकार हा जाती-पातीतून नाही तर किरकोळ वादातून घडला आहे. सरपंचांची या सगळ्या प्रकाराला साथ आहेच पण पोलिसही दुर्लक्ष करतायत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वाळीत टाकण्याचा प्रकार सुरु आहे तंटामुक्त पुरस्कार मिळालेल्या गावातच.

निर्मल ग्राम आणि तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळालेलं रत्नागिरी जिल्ह्यातलं हे कशेडी गाव. पुरस्कार मिळाला म्हणजे गावात सगळं आलबेल आहे असं अजिबात नाही. उलट याच गावातल्या बबन म्हादगे यांच्या कुटुंबाला एका किरकोळ वादातून आठ वर्षांपूर्वी वाळीत टाकण्यात आलंय. बबन म्हादगे म्हणतात, मैतीला जाऊ देत नाहीत , मंदिरात जाऊ देत नाहीत, आमच्या आमंत्रण पत्रिका बंद केल्यात ते आम्हाला सांगतात की, 'तुम्ही या कशेडी गावात रहायचच नाही.'

वाळीत टाकलेल्या म्हादगेंच्या कुटुंबाबरोबर संपर्क ठेवला म्हणून साळवींना दहा हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आलं. त्यांनी नकार दिला म्हणून मग त्यांनाही वाळीत टाकण्यात आलं.

बाबा साळवी म्हणतात, बहिष्कार माझ्यावर टाकला की मी मादगेंशी बोलतो म्हणून. 3 टायम मी बैठक लावली. त्तर त्यांनी सांगितलं की, 10 हजार रुपये तू भर आणि गावाला भेट हे कुणी सांगितलं. तर सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष आणि त्यांचा भाऊ नथू गावनकर यांनी.

आत्तापर्यंत या गावातल्या पाच कुटुंबांना वाळीत टाकण्यात आलंय आणि याशिवाय अनेक गरीब कुटुंबांकडून 500 ते 1000 रुपये दंडाच्या रुपात वसूल करण्यात आले आहेत.

श्रीपत साळवी म्हणतात, ते आमच्यापासून चुकी झाली म्हनून आमी गावाला मिलून दंड भरला. हजार रुपये.हे सगळं सुरू आहे खुद्द सरपंच आणि गावच्या तंटामुक्त समितिच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार.

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोविंद गावनकर म्हणतात, पोलीस स्टेशनची गाडी हिथपर्यंत आली म्हणजे गाडीमध्ये टाकण्यासाठी कायतरी पायजे की नको..? झाला तसा प्रकार होतो. गावचा नियमच आमचा असा आहे. तुम्ही जर गुन्हा कबूल केलात तर देवाला तुम्ही कायतरी. म्हणजे लायटा वैगेरे जलनार. तुमी काय मानसाला मजूरी देताव,,? म्हनजे तुमी देवाच्या फुड्यात काय ठेवायचं ते ठेवा.

वाळीत टाकल्याच्या विरोधात या कुटुंबांनी अनेकवेळा खेड पोलिसात धाव घेतली, पण पोलीसांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. असंच चित्र आहे आणि त्याचवेळेस व्यवस्थेचा धाक दाखवून या कुटुंबांचं आर्थिक आणि मानसिक शोषण सुरूच आहे.

First published: April 5, 2012, 5:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या