गुजरातमध्ये पुन्हा उमललं कमळ, पोटनिवडणुकीत भाजपचा 20 हजार मतांनी दणदणीत विजय

गुजरातमध्ये पुन्हा उमललं कमळ, पोटनिवडणुकीत भाजपचा 20 हजार मतांनी दणदणीत विजय

भाजपचे बावलिया हे 20,000 मतांनी जिंकून आले आहेत. यानिवडणुकीत काँग्रेसच्या नाकिया यांचा दारुण पराभव झाला आहे.

  • Share this:

गुजरात, 23 डिसेंबर : गुजरातच्या जसदण विधानसभा पोटनिवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव मिळाल्यानंतर आज गुजरातमध्ये भाजपच्या पदरी विजय आला आहे. भाजपचे बावलिया हे 20,000 मतांनी जिंकून आले आहेत. यानिवडणुकीत काँग्रेसच्या नाकिया यांचा दारुण पराभव झाला आहे.

20 डिसेंबरला यासाठी मतदान करण्यात आलं. भाजपच्या या पोटनिवडणुकांमध्य़े कोळी समाजाचे शक्तीशाली आणि राज्य मंत्रिमंडळातले कुंवरजी बावलिया यांना तिकिट देण्यात आलं होतं. तर काँग्रेसकडून अवसर नाकिया यांना उमेदवारी दिली होती.

नाकिया हे राजकोट जिल्हा पंचायतीचे सदस्य आहेत. ते 5 वेळा खासदार म्हणून निवडणून आले होते. नाकिया हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. बावलिया यांनी 2017मध्ये काँग्रेसमधून उमेदवार मिळवली होती. पण त्यानंतर त्यांनी त्यागपत्र देत भाजपमध्ये प्रवास केला आणि मंत्री बनले होते.

खरंतर जसदणच्या या विधानसभा पोटनिवडणुका भाजपसाठी अतिशय महत्त्वाची होती. जसदण विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये बावलिया आणि नाकिया यांच्यासह आणखी 6 उमेदवार रिंगणात होते.

तर दुसरीकडे झारखंडच्या नक्षल प्रभावित असलेल्या कोलेबिरा पोटनिवडणुकांसाठी मोठी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे वसंत सोरेंग, झारखंड पक्षाकडून मेनन एक्का आणि काँग्रेसकडून नमन विक्सेल कोंगाडी यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. तर झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.

VIDEO : याला काळीज नसावच, आधी गाडीने दांपत्याला उडवलं, नंतर पळून जाताना पुन्हा चाकाखाली चिरडून निघून गेला

First published: December 23, 2018, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading