योगी आदित्यनाथ यांची बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात कारवाईची मोहीम

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2017 12:04 AM IST

 योगी आदित्यनाथ यांची बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात कारवाईची मोहीम

 yogi3423

27 मार्च : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बेकायदेशीर कत्तलखाने आणि मांसविक्री दुकानांवर कारवाईची मोहीम उघडलीय.

ज्यांच्याकडे अधिकृत परवाने आहेत ते दुकानदार आपला व्यवसाय सुरू ठेवू शकतात पण बेकायदेशीरित्या मांसविक्री करणाऱ्या दुकानांवर मात्र कारवाईचा हातोडा उगारला जातोय. पण त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मांसाचा तुटवडा जाणवू लागलाय. चिकन आणि अंड्यांच्या दुकानांवर कारवाई होणार या मात्र अफवा आहेत. त्याकडे दुर्लक्ष करावं, असं सरकारने म्हटलंय. या कारवाईमुळे पश्चिम उत्तर प्रदेशमधली मांसविक्रीची दुकानं बंद आहेत.

काही जणांकडे कागदपत्रं असूनही त्यांच्यावर कारवाई केली गेली, असं नोयडामधल्या दुकानदारांचं म्हणणं आहे. लखनौमध्येही दुकानदारांवर दुकानं बंद करण्याची सक्ती करण्यात येतेय. त्यांच्याकडच्या परवान्यांचं नूतीकरण करण्यासाठी त्यांची छळवणूक केली जातेय, अशी त्यांची तक्रार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 12:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...