खा. गायकवाडांच्या समर्थनार्थ आज उस्मानाबाद बंद, सेनेचा हक्कभंग आणण्याचा विचार

खा. गायकवाडांच्या समर्थनार्थ आज उस्मानाबाद बंद, सेनेचा हक्कभंग आणण्याचा विचार

  • Share this:

ravindra-gaikwad_759

27 मार्च :  एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप असणाऱ्या शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसेनेनं उस्मानाबाद बंदची हाक दिली आहे. उस्मानाबादसह अनेक तालुक्यांमध्ये हा बंद पाळण्यात येत असून त्यामुळे अनेक दुकानं बंद आहेत. दुसरीकडे राज्यसभेतही रविंद्र गायकवाडांना घातलेली विमान प्रवास बंदी ही चुकीचं असल्याचं खासदारांनी म्हटलंय. त्यावर राज्यसभेत काही वेळ गोंधळही निर्माण झाला. सपाचे नरेश अग्रवाल गायकवाडांच्या बाजूनं उभे राहीले आहे.

‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गायकवाड चर्चेत आले होते. विमान कंपन्यांनी त्यांना प्रवास करण्यावर बंदी घातल्यानंतर ते रेल्वेने उस्मानाबादकडे परत निघाले होते, अशी चर्चा होती. मात्र, नेमके कोठे आहेत आणि कधी परतणार, याकडे जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत.

हक्कभंग आणण्याचा विचार

खासदार रवींद्र गायकवाड यांना प्रवास नाकारणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गायकवाड यांना सेवा नाकारणाऱ्या सर्व विमान कंपन्यांविरोधात शिवसेना लोकसभेत हक्कभंग आणणार असल्याचे समजते. खरं तर  हा हक्कभंग आजच मांडण्यात येणार होता, पण काही कारणास्तव तो आता बुधवारी मांडण्यात येणार आहे. देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत. कायद्यानुसार अशाप्रकारे कोणत्याही प्रवाशाला तिकीट नाकारता येत नाही, हाच मु्द्दा उचलून धरत विमान कंपन्यांविरोधात हक्कभंग आणण्याची शक्यता असल्याचे समजते.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...