S M L

ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने निघालेले मुजोर खा. गायकवाड ट्रेनमधूनच गायब

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2017 01:10 PM IST

Gaiwade13

25 मार्च : ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसनने निघालेले शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत. ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यामुळे विमानप्रवास करू न शकणारे  गायकवाड हे ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने मुंबईला निघाले होते. मात्र, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलला दाखल झाली तेव्हा त्यात गायकवाड नव्हते.

दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर रवींद्र गायकवाड शुक्रवारी संध्याकाळी 4.45 च्या ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने निजामुद्दीन स्टेशनवरुन एका खासदाराचे सहकारी बनून निघाले होते. मात्र, रेल्वे प्रवासादरम्यानसही त्यांची पत्रकारांशी बातचीत झाली. परंतु तब्येतीचं कारण देत रवींद्र गायकवाड मथुरेलाच ट्रेनमधून उतरले. नियोजीत वेळेनुसार ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस ट्रेन मुंबई सेट्रलला पोहोचली. मात्र, या ट्रेनमध्ये गायकवाड नव्हते. ट्रेनमधील सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनूसार खासदार गायकवाड शेवटचे वापी स्टेशनवर दिसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानात मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वी एअर इंडियाने तसंच, देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना  ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या विमानप्रवासावर मर्यादा आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2017 12:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close