युतीचे अधिकार मुनगंटीवारांना

24 जूनऔरंगाबादमध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाच्या वादावरून शिवसेना भाजप युती धोक्यात आली आहे. युतीबाबत पुनर्विचार करण्याचा इशारा भाजपने दिला होता. आज मुंबईत होणार्‍या बैठकीत यावर निर्णयाची शक्यता होती. पण अजूनही यावर निर्णय होऊ शकलेला नाही. आता औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेबरोबर राहायचे की युती तोडायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहेत. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. बैठकीत सर्व बाजूंनी विचार झाला. त्यानंतर औरंगाबादसंदर्भात निर्णयाचे सर्वाधिकार मुनगंटीवारांना देण्यात आले.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2010 09:56 AM IST

युतीचे अधिकार मुनगंटीवारांना

24 जून

औरंगाबादमध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाच्या वादावरून शिवसेना भाजप युती धोक्यात आली आहे. युतीबाबत पुनर्विचार करण्याचा इशारा भाजपने दिला होता.

आज मुंबईत होणार्‍या बैठकीत यावर निर्णयाची शक्यता होती. पण अजूनही यावर निर्णय होऊ शकलेला नाही. आता औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेबरोबर राहायचे की युती तोडायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहेत.

भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. बैठकीत सर्व बाजूंनी विचार झाला. त्यानंतर औरंगाबादसंदर्भात निर्णयाचे सर्वाधिकार मुनगंटीवारांना देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...