योगी अदित्यनाथांनी 100 हून अधिक पोलिसांना दाखवला घरचा रस्ता

  • Share this:

yogi-U10141249868T6D-@LiveMint

24 मार्च :  उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून योगी आदित्यनाथ एकामागो एक निर्णय घेतायत तसंच निर्णयाची अंमलबजावणी करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही योगी अदित्यनाथांनी कठोर पाऊले उचलली आहेत. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या 100 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. पोलीस निलंबनाची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची घडी नीट बसवण्याचे काम करत आहेत. गेल्या चार दिवसात त्यांनी 100 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित झालेले कर्मचारी हे गाजियाबाद, मेरठ आणि नोएडा या भागातील आहेत. तसंच, लखनऊमधील सात अधिकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

जे लोक आपल्या कामात दिरंगाई करत आहेत, टाळाटाळ करत आहेत त्या अधिकाऱ्यांना शोधा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 08:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading