संसद परिसरात सेनेच्या कार्यकर्त्याने ओवेसींना थप्पड लगावली ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2017 04:01 PM IST

संसद परिसरात सेनेच्या कार्यकर्त्याने ओवेसींना थप्पड लगावली ?

owasi4423 मार्च : एमआयएमचे खासदार असउद्दीन ओवेसी यांच्यावर हल्याचा प्रयत्न झाला. संसद परिसरात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांने मारहाणीचा प्रयत्न केलाय. मात्र, ओवेसींनी मारहाणीचा प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलंय.

संसद परिसर पाहण्यासाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता गोरख खर्जुले आला होता. संसद भवनाचा आजचा कार्यकाळ आटोपून एमआयएमचे खासदार असउद्दीन ओवेसी  संसद भवनाच्या पार्किंगमध्ये आपल्या गाडीजवळ आले होते. त्यावेळी गोरख खर्जुले तिथे आला. आणि त्याने आमच्या समाजाबद्दल तुम्ही वादग्रस्त विधान का करता असा जाब विचारला आणि ओवेसींवर हात उगारला.

ओवेसींनी लगेच आपल्या गाडीत बसून हल्ला परतवून लावला. आणि तिथून ते निघून गेले. यानंतर गोरखने स्वत: मीडियाला ओवेसी यांना आपण थपड्ड लगावली असा दावा केला. सुरक्षारक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी गोरखला संसदेच्या बाहेर काढलं. मात्र झालेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.पण याबद्दल ओवेसी यांनी अजून कोणतीही तक्रार केली नाही. असा कोणताच प्रकार घडला नसल्याचा दावा ओवेसींनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...