खूशखबर!; गृहकर्जाचा हप्ता 2 हजारांनी कमी होणार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2017 11:12 AM IST

खूशखबर!; गृहकर्जाचा हप्ता 2 हजारांनी कमी होणार

 Home-Loan-Transfer

23 मार्च :  मुंबई पुण्यासारख्या शहरात तुम्ही तुमच्या हक्काचं पहिले घरं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर  मोदी सरकारने तुमच्यासाठी नवी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत गृह कर्जावर 3 ते 4 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना या कर सवलतीचा फायदा होणार आहे. एवढच नाही तर या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर घर खरेदी केलेल्या लोकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तुमचं वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाखांच्या दरम्यान असेल, तर 9 ते 12 लाखांपर्यंतच्या कर्जावर तीन ते चार टक्क्यांची सवलत मिळणार आहे.  त्यामुळे गृहकर्जाचा हफ्ता दोन हजारांनी कमी होणार आहे.

‘मध्यमवर्ग फक्त आयकर देऊनच नव्हे, तर अन्य अनेक मार्गांनीदेखील अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावत आहे. त्यामुळेच सरकारने मध्यमवर्गाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सरकारकडून फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांनाच घर खरेदी करताना व्याज दरात सवलत देऊन मदत केली जात होती. मात्र आता पहिल्यांदाच वर्षाला १२ लाख आणि १८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांनादेखील व्याज दरात सवलत मिळणार आहे,’ अशी माहिती गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...