S M L

राम मंदिराचा प्रश्न सामंजस्याने तोडगा काढा, सुप्रीम कोर्टाचा सल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Mar 21, 2017 01:24 PM IST

Supreme court of india

21 मार्च :   आयोध्येतील राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. दोन्ही बाजुच्या पक्षकारांनी हा विषय बाहेरच चर्चेतून सोडवावा. गरज पडल्यास न्यायालय त्यात हस्तक्षेप करेल, असा महत्वपूर्ण सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा सल्ला दिला असून न्यायालयाने घेतलेल्या या भूमिकेचं सरकारनं स्वागत केलं आहे.

राम मंदिराचा विषय हा संवेदनशील आणि भावनेचा विषय आहे.  अशा गोष्टी कोर्टाबाहेर सोडवलेल्या बऱ्या असतात कारण या मुद्द्यांशी लोकांच्या भावनाही जुडलेल्या आहेत. त्यामुळे पक्षकारांनी सुसंवादातून हा विषय सोडवणेच चांगले होईल, असं सांगतानाच संबंधीत पक्षकारांशी चर्चा करा आणि त्यात झालेल्या निर्णयाची माहिती 31 मार्चपर्यंत न्यायालयाला द्या, असे आदेशही न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांना दिले आहेत.  त्यावर स्वामींचं असं म्हणणं होतं की कोर्टाबाहेर प्रकरण सोडवा, असा आदेश देण्यात यावा. त्याला सरन्यायाधीशांनी आक्षेप घेतला. आम्ही तुम्हाला हे सुचवतोय, त्याचा आदेश कसा देता येईल, असं ते म्हणाले.

तसंच, तुम्ही तयार असाल तर या प्रकरणात आम्ही मध्यस्थी करतो, असं ही सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायधीश खेहर म्हणाले. पण बाबरी मशीद कृती समितीनं सरन्यायाधीश मध्यस्थ म्हणून नको, अशी भूमिका घेतली आहे. हा मुद्दा सोडवता येऊ शकतो, पण तो सोडवावा लागेत तो कायद्याच्या आधारे, भावनांच्या आधारे नाही, अशी भूमिका बाबरी मशीद कृती समितीची आहे.

सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले?

Loading...

हा मुद्दा कोर्टाबाहेर सोडवला पाहिजे. याचं कारण म्हणजे या प्रकरणात लोकांच्या भावना गुंतल्या आहेत. अशा गोष्टी कोर्टाबाहेर सोडवलेल्या बऱ्या. थोडं घ्या, थोडं द्या. तुम्हाला (स्वामींना) हवं असेल आणि दोन्ही पक्ष समोरासमोर बसणार असतील, तर मी मध्यस्थी करायला तयार आहे. पण तुम्हाला जर कोर्टानंच याचा निर्णय करावा असं वाटत असेल, तर मग मी त्या खंडपीठाचा भाग नसेन. पुढची सुनावणी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ठेवायचा विचार आम्ही करतोय.

दरम्यान, हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने त्यावर लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी स्वामी यांनी केली होती. प्रभू रामाचा जिथे जन्म झाला होता, ती जागा बदलता येणार नाही. मुस्लिमांनी ती जागा राम मंदिरासाठी सोडावी. मशिदीसाठी शरयू नदीपलिकडे जागा देण्यात यावी अशी मागणी करतानाच मुस्लिम लोक कुठेही नमाज पढतात. त्यामुळे मशीद कुठेही असली तरी काही फरक पडत नसल्याचं वक्तव्यही स्वामी यांनी केले. राम मंदिराचा प्रश्न चर्चेतून सोडवण्यासाठी आम्ही केंव्हापासून तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 01:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close