S M L

रक्षकच झाले भक्षक, जेसीबी मशीनच्या साह्याने वाघाला ठार मारलं

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2017 10:05 PM IST

रक्षकच झाले भक्षक, जेसीबी मशीनच्या साह्याने वाघाला ठार मारलं

20 मार्च : उत्तराखंडमधल्या कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये जेसीबी मशिन घुसवल्याने एक वाघ मृत्युमुखी पडल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे वनविभागाच्या पथकानेच हे कृत्य केलंय.

या वाघाने गेल्या आठवड्यात दोन खाण कामगारांना ठार केलं होतं. त्यानंतर या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने ऑपरेशन हाती घेतलं. पण वाघाला पकडण्याऐवजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावर जेसीबी मशिनच घुसवलं. ज्यांच्यावर वाघांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच वाघाची अशा प्रकारे हत्या केलीय.

पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमींनी या घटनेचा निषेध करत या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. हा वाघ जेसीबी मशिनमुळे मरून पडल्यानंतर मग वनकर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जाळं टाकलं. त्याला नंतर नैनितालच्या प्राणीसंग्रहालयात उपचारासाठी नेण्यात आलं पण या वाघाचा मृत्यू ओढवला. नॅशनल टागर कॉन्झर्व्हेशन ऑथॉरिटीने या घटनेची चौकशी करण्यासाठी पथक पाठवण्याचं ठरवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 10:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close