S M L

योगी आदित्यनाथांनी मंत्र्यांना दिले संपत्ती जाहीर करण्याचे आदेश

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2017 02:19 PM IST

योगी आदित्यनाथांनी मंत्र्यांना दिले संपत्ती जाहीर करण्याचे आदेश

20 मार्च :  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कामाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करणार असं दिसते. पदभार स्वीकारताच आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना 15 दिवसात स्वत:च्या संपत्तीची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यावर भर दिला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

रविवारी योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. योगी आदित्यनाथ पदभार स्वीकारल्यावर लोकभवनमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत योगी आदित्यनाथांनी सर्व मंत्र्यांना संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. वार्षिक उत्पन्न, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील आता मंत्र्यांना द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर योगी आदित्यनाथ यांनी जारी केलेल्या आदेशांपैकी हा पहिला आदेश आहे. दुसरं म्हणजे नेत्यांनी वाचाळपणा करू नये, जपून बोलावं असंही आदित्यनाथ यांनी नेत्यांना समज दिलीय. त्यावर खरं तर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण स्वत: आदित्यनाथच वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच सर्व मंत्र्यांचा संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. योगी आदित्यनाथांनीही या बाबतीत मोदींचेच अनुकरण केले असे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 02:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close