योगी आदित्यनाथ यांनी घेतली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

योगी आदित्यनाथ यांनी घेतली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

  • Share this:

YOGI

19 मार्च : योगी आदित्यनाथ यांनी आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयेतची शपथ दिली. तसंच प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील भाजपचे ज्येष्ठ नेते , तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेदेखील उपस्थित होते.

मंत्रिमंडळातल्या 45 जणांनी या सोहळ्यात  शपथ  घेतली.  हा शपथविधी सोहळा  लखनौमधील काशीराम मेमोरिअल मैदानावर पार पडला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 14 राज्यांतले मुख्यमंत्री या शपथविधी समारंभाला हजर होते. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधीला उपस्थित होते..

 

योगी आदित्यनाथ

-गोरखपूरचे पाच वेळा खासदार

- 1998 पहिल्यांदा खासदार

- 5 जून 1972 रोजी पौडी,गढवालमध्ये जन्म

- 22 व्या वर्षी संन्यास

- मूळ नाव अजय सिंह

केशव प्रसाद मौर्य

मूळ गाव - कौसंबी

तळागाळात कार्य

ओबीसी,दलितांमध्ये लोकप्रिय

एप्रिल 2016पासून उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष

बिगरयादव,ओबीसी वर्गाला भाजपकडे आणलं

दिनेश शर्मा

लखनौचे महापौर

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

भाजपमध्ये २० वर्षांपासून कार्यरत

पंतप्रधानांच्या मर्जीतले

२०१४च्या निवडणुकीनंतर गुजरातचे प्रभारी होते

२०१६-दसऱ्याला मोदींच्या प्रचारसभेचंआयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 02:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading