वाद, वादग्रस्त आणि योगी आदित्यनाथ !

वाद, वादग्रस्त आणि योगी आदित्यनाथ !

  • Share this:

yogi_adityanath_banner3418 मार्च : अनेक दिवसांच्या सस्पेन्स नंतर अखेर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली. वादग्रस्त भाजप खासदार योगी आदित्यनाथ देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे सीएम होणार आहेत. स्वतः मोदी आणि अमित शहांकडून त्यांच्या निवडीला हिरवा कंदील दिला गेला.

उत्तर प्रदेशातला भाजपचा प्रखर हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडलीय. वयाच्या बावीसाव्या वर्षी संन्यास घेतलेल्या अजयसिंह बिष्ट यांची ओळख योगी आदित्यनाथ अशीच राहिली. गोरखपूरच्या गोरक्षपीठाचे तत्कालिन महंत अपैद्यनाथ यांचे ते पट्टशिष्य झाले. त्यानंतर 1998 मध्ये राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आदित्यनाथ हे सलग पाच वेळा खासदार म्हणून गोरखपूरमधून निवडून आले. सडेतोड वक्तव्यामुळे ते कायम वादात राहिले. अगदी राममंदिराबाबत त्यांचं वक्तव्य असो किंवा शाहरुख खानबाबत...ते कायम कोणत्या ना कोणत्या वादात अडकतच राहिले.

आदित्यनाथ यांनी भाजपलाही आव्हान द्यायला मागंपुढे पाहिलं नाही. 2007 च्या गोरखपूर दंग्यात त्यांना अटक झाली. त्यामुळे संतापलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी गोदान एक्स्प्रेस जाळली होती. 2008 मध्ये त्यांच्यावर आझमगडमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. युपीच्या विधानसभा निवडणुकीसाठी आदित्यनाथ हे भाजपचा चेहरा असतील अशी चर्चा होती. पण मोदी आणि अमित शहांनी आदित्यनाथ यांना भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करणं टाळलं होतं. पण निकालानंतर आता आदित्यनाथांच्या गळ्यातच मुख्यमंत्रिपदाची माळ पडलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 18, 2017, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading