उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2017 07:23 PM IST

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ

yogi_adityanath318 मार्च : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झालीय. लखनौमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस केशवप्रसाद मौर्य या दोघांनाही उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलंय. खरंतर ही सगळीच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती पण अखेर योगी आदित्यनाथ यांचीच निवड झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

योगी आदित्यनाथ हे गोरखपूरचे खासदार आहेत. 1998 नंतर ते सलग पाच वेळा गोरखपूरमधून निवडून आलेत. मुस्लीमधर्मीय आणि ख्रिश्चनधर्मीयांच्या धर्मातंर मोहिमेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराची ही मोहीम सुरू झाली होती.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणीही त्यांच्यावर आरोप होते. प्रक्षोभक भाषणं करून दंगली भडकवल्याच्या आरोपांवरून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.  त्यानंतर त्यांच्या हिंदू युवा वाहिनी या संघटनेने मुंबई-गोरखपूर गोदान एक्सप्रेस जाळल्याची घटना घडली होती.

योगी आदित्यनाथ हे 44 वर्षांचे आहेत. गोरखपूरमधल्या गोरखनाथ मठाचे ते महंत आहेत. महंत आदित्यनाथ यांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर 2014 मध्ये त्यांना महंत ही उपाधी देण्यात आली. त्यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना केलीय. प्रखर हिंदुत्ववादी संघटना अशीच या संघटनेची ओळख आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजपने योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी निवड केल्यामुळे यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...