S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आग्र्यात दोन ठिकाणी कमी तीव्रतेचा स्फोट

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2017 01:16 PM IST

आग्र्यात दोन ठिकाणी कमी तीव्रतेचा स्फोट

आग्रा शहरात आज (शनिवारी) सकाळी 2 ठिकाणी स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आग्रा कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकाजवळील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि एका घराच्या टेरेस अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. या स्फोटांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी स्फोटांची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.

काही दिवसांपूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेने आग्र्यातील ताजमहाल उडवून देण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर आग्र्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसंच पोलिसांकडूनही यमुना नदीच्या परिसरात गस्त वाढविण्यात आली होती.दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार पहाटे पाचच्या सुमारास वाजता रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या प्लंबरच्या घरात पहिला स्फोट झाला. त्यानंतर सुमारे पाऊणतासाने स्थानकाच्या परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दुसरा स्फोट झाला. आता या घटनेनंतर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close